वर्ध्यात नितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन निर्मितीची मंजुरी

नागपूर : १५ मे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला कोरोना काळात होणाऱ्या ब्लॅक फंगस इन्फेक्शनसाठी एम्फोटेरिसीन बी या इंजेक्शन निर्मितीची मंजुरी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून मिळाली आहे.
येत्या १५दिवसात वर्धा येथे या इंजेक्शनचे उत्पादन सुरु होईल. एका इंजेक्शनची किंमत ७ हजार रुपये असून ब्लॅक फंगसच्या एका रुग्णाला ४० ते ५० इंजेक्शन दिले जात आहेत. यामुळे हे इंजेक्शन रुग्णांना सहज उपलब्ध होत नाही. वर्धा येथे निर्मित हे इंजेक्शन फक्त १२०० रुपयात मिळेल. दररोज २० हजार इंजेक्शन जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीत तयार होतील.

Leave a Reply