पुढील आठवड्यात डीआरडीओने शोधलेल्या २डीजी औषधाचे १० हजार डोस उपलब्ध होणार

नवी दिल्ली : १५ मे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झालेल्या भारताला आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, एकीकडे नव्या रुग्णांची संख्या स्थिर होत असतानाच आता ऑक्सिजनमुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांसाठी 2-DG हे नवे औषध उपलब्ध होणार आहे
हे औषध संरक्षण आणि संशोधन विकास संस्था अर्थात डीआरडीओ ने तयार केले आहे. या औषधामुळे कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची फारशी गरज भासणार नाही. पुढच्या आठवड्यात देशभरातील रुग्णालयांमध्ये या औषधाचे तब्बल 10 हजार डोस उपलब्ध होतील.
डीआरडीओनं जारी केलेल्या माहितीनुसार 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि 2 डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास 2.5 दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आलेय.
डीआरडीओनं विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरुपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करते.

Leave a Reply