पश्चिम बंगालमध्ये ३० दिवसांचा लॉकडाऊन

कोलकाता : १५ मे – कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांनी संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. १६ मे रोजी पहाटे ६ वाजल्यापासून ते ३० मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचं कोरोनाने निधन झालं. त्यानंतर बंगालमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यसचिव आलापन बंधोपाध्याय यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. अत्यावश्यक सेवांशिवाय राज्यात काहीच सुरू राहणार नाही. तसेच अत्यावश्यक सेवेशी संबंधित लोकांनाच प्रवासाची मुभा असणार आहे. तसेच लग्नामध्ये केवळ 50 लोकच सहभागी होऊ शकतील. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोकच उपस्थित राहतील, असं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं आहे.
लॉकडाऊनचं सक्तीचं पालन करणं बंधनकारक आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि तोंडाला मास्क लावणंही बंधनकारक आहे, असंही त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यास महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा आज सकाळी कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना कोलकाताच्या मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. असीम यांना कोरोना झाल्यानंतर त्यांना मेडिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या एक महिन्यांपासून ते रुग्णालयात अॅडमिट होते. त्यांचं ऑक्सिजन लेव्हलही कमी झालं होतं. आज सकाळीच कोरोना नियमांचं पालन करत निमाताला स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. असीम हे कालीघाट येथे राहत होते.

Leave a Reply