सुनील केदार यांनी केले नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक

नागपूर : १४ मे – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कामाचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या काळात माणुसकीचा संदेश देण्यासाठी प्रथम जे पुढे आले ते म्हणाचे नितीन गडकरी होते, असं केदार यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादनात गडकरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जे राष्ट्रीय पातळीवर कोणालाही जमले नाही ते गडकरींनी करून दाखवले, अशा शद्बात केदार यांनी गडकरींच्या कामाचे कौतुक केले.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला, नितीन गडकरींनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. अगदी देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले अशा शद्बात पशुसंवर्धन मंत्र्यांनी फडणवीसांना चिमटा काढला.
यावर उत्तर देताना गडकरींनी म्हटले आहे की, मी कोणत्याही एका व्यक्तीला उद्देशून बोललो नव्हतो, मी जेव्हा बोललो तेव्हा माझ्यासमोर सर्व जनता होती. मात्र हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजला, मुख्यमंत्री देखील मला म्हणाले की चांगले बोलले असं म्हणत गडकरी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Leave a Reply