सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

अमित कुमार

अमित कुमार एक अफलातून व्यक्तिमत्व. ह्याचे गाणे तर सुंदर आहेतच पण ह्याला मुलाखतीत वगैरे बघायला अफलातून मजा येते.
मुक्त मुखाने मान्य करतो की किशोर कुमार चा मुलगा म्हणून कधी जगलोच् नाही.
किशोर कुमार च्या वलयाशी तुलनात्मक जगलो असतो तर आज मी तुमच्या समोर बसताना दिसलोच् नसतो.
किशोर कुमार चा मुलगा म्हणून माझ्याकडे लोकं बघत होते, मी सुद्धा लहान असताना कलकत्त्यात किशोर कुमार ची गाणी गाऊन कधी शाबासकी तर कधी पैसे कमवायचो.
लहानपणी तीच् माझी ओळख होती, इतका रंगुन गेलो होतो की अभ्यास वगैरे कधी केलाच् नाही. शेवटी आई वैतागली किशोर कुमार ला फोन केला की पोरगा अभ्यास वगैरे काही करत नाही, गेला वाया – नुसते तुमचे गाणे गात, चकाट्या पिटत फिरत आहे.
अमित म्हणतो, त्यानंतर किशोर कुमार ने मला मुंबईला बोलावून घेतले आणि माझी मुंबईची कारकीर्द सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे.
दोघेही बाप लेकाला भगवंताचा मुक्त हस्ताने वरदहस्त, असा साक्षात पं. भीमसेन जोशी यांचा आवडता गायक किशोर कुमार…
क्लासिकल गाणा-यांचा चाहता वर्ग म्हणजे पं.भीमसेन जोशी आणि पंत. भीमसेन जोशी, किशोर कुमार चा फॅन – अजब नाते, गजब गाणा-यांचं.
तर अशा किशोर कुमार चा सुपुत्र, ज्याला स्वतः च्या कक्षा माहिती आहेत, आपला सामना जगायचे असेल, स्व चे अस्तित्व स्थापित करायचे असेल तर गाठ बापाशी आहे. ह्याची पुर्ण जाण असणारा पण तरीही स्वतः च्या मस्ती मध्ये जगणारं, अफलातून पात्र म्हणजे किशोर कुमार पुत्र.
पण कधी ह्या भितीपोटी वहावत गेला नाही. दिलखुलास मान्य करतो की पंचम दा ने पहिल्यांदा गाणे दिले आणि सांगितले की तू किशोर कुमार बनायचा प्रयत्न करू नकोस. गायकी मध्ये स्वतः चे स्थान निर्माण कर. अमित कुमार म्हणतो त्या दिवशी अमित कुमार जन्माला आला आणि “बडे अच्छे लगते है” सारख्या एका सुंदर गाण्याची प्रसुती झाली.
अमित कुमार स्वच्छ मनाचा गायक, जे काही आहे अगदी सरळ सरळ भाषेत सरळ रित्या मान्य करणारा, मनात एक आणि तोंडात एक असे बिलकुल नाही. म्हणून अमित कुमार आवडतो.
मुलाखत सुरू असताना जेव्हा किशोर कुमार आणि स्वतः चे अनुभवाचे एक एक पैलू उलगडत जातो, तेव्हा ते सादर करण्याची हातोटी म्हणजे अक्षरशः खुर्चीला खिळवून ठेवतो.
त्याची प्रत्येकाच्या आवाजातली मिमिक्री – पंचम दा आणि किशोर कुमार चे आपापसातील टेलिफोन वर बोलण्याची लकब, आपल्याला खिळवून ठेवते आणि खरोखरीचे निखळ मनोरंजन करते आणि पुढे काय होणार? ही उत्सुकता लागते.
ओ.पी. नय्यर चा आवाज, बोलायची ढब ऐकुन तर असे वाटते की हा माणूस नुसता गायक नाही तर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.हे मान्य करायला हरकत नाही.
तो स्वतः आपल्या जीवनावर सुखी आहे, किशोर कुमार चा मुलगा म्हणून माझ्या पुढे खुप मोठे आव्हान होते..
पण किशोर कुमार चा मुलगा म्हणून मातब्बर संगीत दिग्दर्शकांनी मला खूप सुंदर गाणी गायला दिली. अशा प्रांजळ मताचा.
१९८७ किशोर कुमार चे निधनानंतर तर १९९४ पर्यंत तर जवळपास सगळ्याच संगीत दिग्दर्शक माझे कडुन सर्व नायकांसाठी गाणे गायचे भाग्य लाभले आणि मी स्वतः ला खूप भाग्यवान मानतो की किशोर कुमार चा मुलगा आहे. पण हे सगळे संगीत दिग्दर्शक माझ्यातला किशोर कुमार शोधत होते आणि हळूहळू १९९४ नंतर मला ते टाळायचा प्रयत्न करायला लागले. ही माझ्या लक्षात आले.मी किशोर कुमार होवु शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि म्हणूनच मी स्वतः त्यांच्या मार्गातून वेगळा झालो आणि त्यानंतर देश विदेशातील कार्यक्रम आयोजित करून स्वतः ची उपजिविका चालवित आहेत.
अगदी तितक्याच् शांत स्वरात तो सांगतो की परत माझ्यातला किशोर कुमार ऐकायला लोकं येतात, त्यामुळे कार्यक्रम जरी माझा असला तरी माझ्या कार्यक्रमात ७५% गाणे किशोर कुमार चे असतात आणि २५% गाणे असतात, ही व्यथा सांगायला तो विसरत नाही.
पण तेवढ्याच तडफेने त्यांच्यातील अमित कुमार उफाळून येतो आणि “मेरा भी दिन आएगा” ह्या उक्तीप्रमाणे तो म्हणतो एक दिवस येईल की माझ्या कार्यक्रमात माझी गाणी जास्त असतील आणि किशोर कुमारची गाणी कमी असतील.
अमित कुमार म्हणतो माझं जीवन समुद्राच्या लहरी प्रमाणे कधी खाली कधी वर, कधी खाली तर कधी अत्युच्च शिखरावर असे जगलो. जसा जगलो तसा जगलो! मला जीवन कसा जगलो? ह्याची खंत नाही. मजा घेत घेत जगलो, ह्याचा आनंद आहे.
ईतक्या साध्या भोळ्या स्वच्छ मनाच्या अमित कुमार ने सांगितले की इंडियन आयडॉल १२ मध्ये पैसे देऊन निमंत्रित केले होते आणि सांगितले होते की प्रत्येक गायकाची स्तुती करायची आहे. पैसा घेऊन मी स्तुती केली.
अमित कुमार आम्हाला तुझ्यावर किंवा गाणा-यांवर दोषारोपण करायचेच नाहीए.
गाणारे सर्व कलावंत उत्कृष्ट आहेत. त्यांच्या गाण्यात उणीदुणी काढायची जागाच् नाही. त्यामुळे गाणे गाणा-यांचे कौतुक करण्याशिवाय पर्याय नव्हता.
आमचा रोष आहे तो मोठ मोठे बॅनर खाली मोठ मोठ्या मालिकांच्या नावाखाली प्रायोजित पद्धतीने दर्शकांना मुर्ख बनवण्याचा घाट घातल्या जातो, त्याबद्दल रोष आहे. चांगल्या घरातल्या मुलांना जेव्हा गरीब घरचा चांगला गाणारा मुलगा – आमच्या चॅनेलने त्यांच्या गायकीला परखले, असा खोटा प्रचार करुन टीआरपी वाढवायचा प्रयत्न केला जातो, तेव्हा राग येतो.
अमिताभ बच्चन सुद्धा जेव्हा मुसलमानांचे लांगुलचालन करणारे प्रश्न विचारतो केबीसी मध्ये तेव्हा चीड येते.
हे असले किळसवाणे नाटकं कशासाठी? टीआरपी आणि पैसा कमावण्यासाठी?????
आणि टीआरपी कशी वाढवताय? ??
माझ्या भारतमातेचे सुपुत्र गरीब आहेत, हे सर्व जगाला दाखवून? सर्व जगासमोर माझी भारत माता गरीब आहे असे हिणवून, तुम्ही स्वतः करोडपती बनण्याचा मार्ग प्रशस्त करता तेव्हा चीड येते.
राहायला घर नाही, बापावर इतक्या लाखाचं कर्ज… याॅंव जगुन राहिलो – त्यॉंव जगुन राहिलो, असं जेव्हा टीव्ही वर गरीबीची लक्तरं लोंबत कार्यक्रम करता, तेव्हा राग येतो, ह्या असल्या भारत गरीबी प्रायोजित मालिकांचा.
मागले २-४ वर्षे बघतोय केबीसी, इंडियन आयडॉल आणि तत्सम कार्यक्रमात भारताला गरीब लोकांचा देश दाखविण्याची चढाओढ लागली आहे. काय खरेच् भारत देश गरीब आहे?
सर्व जगाला मार्गदर्शन करण्यासारखा पंतप्रधान लाभलेला देश – गरीब आहे?
सर्वेन भवन्तु सुखिन: सर्वे संतु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यंतु , या कश्चित् दु:खभाग् भवेत!!
सर्व जगताच्या कल्याणाची प्रार्थना करणारा देश गरीब म्हणून हिणविला जावा ह्या अशा मालिकांमुळे ह्याच्या वर आमचा राग आहे.
मोठमोठ्या कलाकारांना अशा प्रायोजित कार्यक्रमांचा हेतू सांगण्याची हिम्मत झाली नाही, ते अगदी सहजरीत्या तू खरंखुरं सांगुन मोकळा झालास. अमित कुमार तू खराखुरा “शहंशाह” आहेस, ह्या कार्यक्रमांची प्रायोजित पोल उघडली. आणि सत्य परिस्थिती उघड केली.
आता दर्शकांना ठरवायचे आहे की मॅच फिक्सिंग असलेल्या कार्यक्रमाला किती प्राधान्य द्यायचे बघण्यासाठी?
सगळ्यांच्या मते किशोर कुमार सारखी जबरदस्त युडलींग करणा-या शण्मुख प्रिया चे नाव घेतात पण माझ्या मते मोहोम्मद दानीश ला ह्यांनी पहिलेच् फिक्स केले आहे, इंडियन आयडॉल १२ चार विजेता म्हणून असा अंदाज आहे. आणि हा दुसरा प्रायोजित कार्यक्रम आहे. समजणा-यांना एवढा इशारा पुरेसा.

भाई देवघरे

Leave a Reply