शहराच्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत घट, १९९६ बाधित, ४९६५ कोरोनामुक्त, तर ७० रुग्णांचे मृत्यू

नागपूर : १४ मे – राज्याच्या उपराजधानीत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे आज बाधितांची संख्या २ हजाराच्या खाली आलेली आहे. तर शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली असून आता ग्रामीण भागातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या शहरातील रुग्णांपेक्षा जास्त आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात १९९६ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून ४९६५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. शहरातील मृत्युसंख्या कायम असून त्यात कमी होताना दिसत नाही आज शहरात ७० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात राज्याच्या उपराजधानीत १९९६ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यात ८५१ रुग्ण ग्रामीण भागातील असून , ११३२ शहरातील तर १३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. तर आज ७० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात २२ ग्रामीण भागातील ३५ शहरातील तर १३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत शहरातील एकूण मृतकांची संख्या ८४७२ वरपोहोचली आहे तर शहरातील एकूण रुग्णसंख्या ४६०६०० वर पोहोचली आहे.
आज शहरात १४१५१ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ३२६२ चाचण्या ग्रामीण भागात तर १०८८९ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहे. आज ४९६५ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले असून शहरातील एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४१३०७२ वर पोहोचली आहे. तर शहराचे कोरोना मुक्तीचे प्रमाण आता ८९.६८ टक्क्यांवर पोहोचले आहे. शहरात सध्या ३९०५६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यातील २०२९७ ग्रामीण भागात तर १८७५९ शहरातील रुग्ण आहेत.

Leave a Reply