मोटारसायकल अपघातात पती आणि पत्नीचा मृत्यू

नागपूर : १४ मे – हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्होलिबारा मार्गावर मोंढा बायपासजवळ मोटरसायकल आणि आयशर मॅटाडोरदरम्यान भीषण अपघात झाला होता. यात मोटरसायकल स्वार पतीचा आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. रवीशंकर कुचनकर आणि शारदा कुचनकर अशी मृतांचे नाव आहेत. रवीशंकर यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला तर शारदा यांचा मृत्यू उपचारादरम्यान रुग्णालयात झाला आहे. घटनेनंतर मॅटाडोर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रविशंकर मारोतराव कुचनकर हे त्यांची पत्नी शारदा कुचनकर यांना घेऊन मोटरसायकलने आमगावकडून हिंगण्याच्या दिशेने जात असताना समोरच्या दिशेने येणाऱ्या आयशर मॅटाडोरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल स्वार रविशंकरचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जखमी महिलेला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. हिंगणा पोलिसांनी मॅटाडोर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply