प्राणवायूची वाहतूक करणारे वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

चंद्रपूर : १३ मे – प्राणवायूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरूवार, १३ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास नागभीड-ब्रम्हपुरी मुख्य मार्गावरील कोर्धा-नवेगाव गावाजवळ घडली. सागर वट्टी असे मृतकाचे नाव आहे. चंद्रपूर येथील शैकीनदास शिवाजी शंभरकर यांच्या मालकीच्या चारचाकी वाहनात चंद्रपूर औद्योगिक वसाहत परिसरात ४४ प्राणवायू सिलिंडर भरल गेलेे. हे वाहन ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रूग्णालयात जात होते.
चंद्रपूर येथून हे वाहन रात्री 10.30 वाजताच्या सुमारास निघाले. रात्री अडीच वाजताच्या सुमारास नागभीड येथून हे वाहन ब्रम्हपुरीच्या दिशेने निघाले. दरम्यान, वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते पलटी झाले. वाहनाच्या मागील ट्रालीत बसलेला सागर वट्टी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची नोंद नागभीड पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास ठाणेदार खेडीकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Leave a Reply