नागपूर : १३ मे – पत्रभेटच्यावतीने ज्ञान दानाचा कार्यक्रम ‘अक्षय दान’ प्रारंभ करण्यात आला असुन उद्या शुक्रवार, १४ मे उपक्रमाचे सायंकाळी ७ वाजता उदघाटन होणार आहे. या आभासी कार्यक्रमाला प. पू. सद्गुरूदास महाराजांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उदघाटन कार्यक्रमानंतर पुण्याच्या श्री वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त शरदशास्त्री जोशी महाराज यांचे ‘प. पू. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या लोककल्याणकारी मंत्रांची उपयुक्तता’ या विषयावर मार्गदर्शन लाभेल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञा फडणीस करणार असून सूत्रसंचालन किरण गोडबोले करणार आहेत.
19 तारखेपर्यंत दररोज सायंकाळी 7 वाजता होणा-या या कार्यक्रमात 15 मे रोजी पुण्याच्या श्री वासुदेव निवासचे विश्वस्त देवीदास जोशी ‘प. पू. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज प्रणीत मानसपूजा’ या विषयावर तर 16 तारखेला डॉ. सुनीता जोशी ‘अंकशास्त्र’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. 17 तारखेला त्या ‘पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी’ विषयावर भाष्य करतील. 18 व 19 तारखेला प्रा. अशोक पोफळे ‘हस्तरेषा शास्त्र, एक परिपूर्ण शास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम पत्रभेट सभासदांसाठी विनामूल्य आहे. पत्रभेटचे सभासदत्व प्राप्त केल्यानंतर या कार्यक्रमात सहभागी होता येईल. त्याकरिता मंगेश बरबडे व प्रणोती रोटीवार यांच्याशी संपर्क साधावा.