नागपूर : १३ मे – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनारुग्णांचे रोजचे मृत्यू पुन्हा भीतीदायक वाटायला लागले आहेत. काही प्रमाणात कमी झालेल्या मृत्युसंख्येत आज पुन्हा वाढ नोंद करण्यात आली आहे. आज पूर्व विदर्भात १६४ बाधित रुग्णांचे मृत्यू झाले असून त्यात ७७ मृत्यूची नोंद नागपुरात झाली आहे. आज पूर्व विदर्भात ४६०६ रुग्णांची नोंद झाली असून ८४५८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर राज्याच्या उपराजधानीत आज २२२४ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली असून ५८८४ रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहे.
गेल्या २४ तासात नागपुरात २२२४ रुग्णांची नोंद झाली असून त्यात १०५० ग्रामीण भागातील, ११६३ शहरातील तर ११ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. शहराची रुग्णसंख्या आता ४५८६०४ वर पोहोचली आहे. शहरात आज ७७ मृत्यूची नोंद झाली असून त्यात २५ रुग्ण ग्रामीण भागातील ४१ शहरातील तर ११ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्युसंख्या आता ८४०२ वर पोहोचली आहे.
आज शहरात १५७१४ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ३८०६ ग्रामीण भागात तर ११९०८ चाचण्या शहरात घेण्यात आल्या. आज ५८८४ बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४१०५८६ वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्तीचा दर ८८.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या शहरात ३९६१६ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील १९४६८ ग्रामीण मधील तर २०१४८ रुग्ण शहरातील आहेत.