देवेंद्र फडणवीस साहेब, एक पत्रकार परिषद घेवून, ह्यांची काय त्रुटी आहेत त्या सविस्तर सामान्य मराठा जनतेसमोर आणण गरजेचं आहे.
आज जो संभ्रम निर्माण केला जातोय की फडणवीस नी केलेला कायदा फुलप्रुफ नाही आणि आपली जबाबदारी केंद्र सरकार वर ढकलून ही मविआ कंपनी, पुढील खेळी साठी मोदी सरकारला कोसण्यासाठी सज्ज झाली.
ह्यांनी जी घोर चुका केल्या आहेत, यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. हे जाणतात की पुढल्या निवडणुकीत ह्यांना (शिवसेनेला आणि राकॉ) मराठा ह्यांना मतदान करणार नाही, मं ह्याचा घोर या दोन्ही पक्षांना लागला आहे.
आणि म्हणूनच मतांचा मराठा गठ्ठा स्वतः कडे वळाला, यासाठी हा सगळा निती भ्रष्ट, खालच्या पातळीचे राजकारणातील पहिली खेळी आहे.
जर “राज्य मागासवर्ग आयोग” गठन न करता ही जर साखळी तोडली आहे आणि वैध रित्या “मराठा आरक्षणाला मंजुरी” देण्याचा वैध मार्ग मविआ ने, बंद केला आहे. हे मुख्यमंत्री सोईस्करपणे काल पत्रकार परिषदेत अधोरेखित सांगण्याचे विसरले. म्हणण्यापेक्षा सामान्य मराठा समाजाची दिशाभूल केली.
कालची मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद ही फक्त एवढेच सांगण्यासाठी होती की मराठा आरक्षणाचा चेंडू आम्ही केंद्राकडे ढकलला. आणि फडणवीसांचा कायदा फुलप्रुफ नाही. पण ह्याचे संवैधानिक परिभाषेत मुख्यमंत्री सांगु शकले नाहीत आणि टोलवाटोलवी “तुम्ही बघताच् आहात” अशी उत्तरे देऊन मोकळे झालेत. मा. अशोक चव्हाणांना सुद्धा बोलण्याची पाळी येवु न देता, ताबडतोब पत्रकार परिषद रद्द केली.
फडणवीस साहेब, वस्तुस्थिती जोपर्यंत सामान्य मराठा लोकांपर्यंत पोहचवा आणि मविआ ची ही खेळी उघडी पाडुन, लवकरच हे सरकार पाडा ही कळकळीची विनंती.
“करेक्ट कार्यक्रम च्या प्रतिक्षेत्….
महाराष्ट्राची कोरोना सरकारने बाधलेली, गांजलेली रयत..
आता तरी सोडवा फडणवीस ह्या सरकारच्या जाचा तून, ना कोविडची लस ह्यांना व्यवस्थितपणे सगळ्यांना देता येते आणि ना मराठा आरक्षण – ह्यांचे प्रत्येक गोष्टीत फक्त राजकारण…..
भाई देवघरे.