४०० नक्षलवाद्यांना झाली कोरोनाची लागण, १० नक्षलवाद्यांचा मृत्यू

गडचिरोली : ११ मे – देशभरात कोरोनानं थैमान घातलं असताना आता छत्तीसगडच्या जंगलातही कोरोना विषाणूचा संसर्ग पाहायला मिळतोय. कारण छत्तीसगडमधील नक्षल दलमच्या अनेक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बस्तर क्षेत्रात ४०० नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. तर १० नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोरोनावरील उपचारांसाठी नक्षलवाद्यांना जंगलाबाहेर येऊन उपचार घेणं गरजेचं बनलं आहे.
जंगलात लपून बसलेल्या शेकडो नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक नक्षल दलम चिंताग्रस्त आहेत. बिजापूर सुकमा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांनी सभा आयोजित केली होती. या सभेत जवळपास 400 नक्षलवादी उपस्थित होते. या सभेतूनच नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्षलवाद्यांमुळे अतिदुर्गम भागात स्थानिक आदिवासींमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अलीकडेच बिजापुर जिल्ह्यात सुरक्षा दलावर हल्ला करणा-या कमांडर हिडमाच्या पीपल्स गुरील्ला आर्मीच्या नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा पोलिसांनी केला

Leave a Reply