शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आटोक्यात, २२४३ बाधित तर ६७२५ कोरोना मुक्त

नागपूर : १० मे – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. एक आठवड्यापासून कमी होत असलेली रुग्णसंख्या व वाढत असलेले कोरोनमुक्तीचे आकडे दिसालादायकच म्हणावे लागतील. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात ५०३७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ९६०५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, आज पूर्व विदर्भात १०४ रुंगांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर शहरात आज २२४३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत तरं ६७२५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत आणि ६५ रुंगांचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ५० हजरांच्या खाली आलेली आहे सध्या शहरात ४६५९६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
नागपुरात गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत घट झाल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात नागपुरात २२४३ रुग्णांची नोंद झाली असून त्यात ८६६ ग्रामीण भागातील १३६३ शहरातील तर १४ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. शहराची एकूण रुग्णसंख्या आता ४५३८४८ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासात ६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात १९ रुग्ण ग्रामीण भागातील ३२ शहरातील तर १४ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्युसंख्या आता ८२५८ वर पोहोचली आहे.
आज शहरात १४४६४ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ४६९६ चाचण्या ग्रामीण भागात तर ९७६८ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. आज ६७२५ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३९८९९४ वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्तीचा दर ८७.९१ टक्क्यांवर गेला आहे. सध्या शहरात ४६५९६ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यात २३१२९ ग्रामीणमधील तर २३४६७ शहरातील रुग्ण आहेत.

Leave a Reply