वऱ्हाडी ठेचा …. अनिल शेंडे

प्रश्नचिन्ह !

इतकी भयंकर नकारात्मकता, काडीबाजपणा आणि खुटीउपाडपणा
काही लोकांमधे येतोच कुठून ?
की हे लोक जन्मालाच येत असावे
प्रश्नार्थक चिन्हांच्या भेंडोळ्यात लिपटून ?
मोदींच्या विदेश दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह !
सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह !
डोकलामवर प्रश्नचिन्ह !
आणि आता व्हॅक्सीनवर प्रश्नचिन्ह !
पहिले क्वालिटीवर तर आता क्वांटीटीवर प्रश्नचिन्ह !
काय करावं तरी काय अशा नकारी, भिकारी लोकांचं ?
काही नातं असेल का हो यांचं आणि
त्या सुर्यप्रकाशात काहीही न दिसणाऱ्या घुबडांचं ?

      कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply