अकोला : ११ मे – अकोला-वाडेगाव या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था असून अनेकांचे बळी खराब रस्त्यामुळे गेले आहेत. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करा अशी मागणी केली होती. या मागणीसाठी गावातील मोबाईल टॉवरवर चढून त्याने आंदोलन केले.
अकोला – वाडेगाव रस्त्याची मागील दोन ते तीन वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने व या मार्गाच्या अवस्थेसाठी जबाबदार संबंधितावर कारवाई न झाल्याने शैलेश मापारी यांनी आत्मदहनाचा इशारा कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार वाडेगाव येथील बेसिक शाळेच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले.
अकोला-वाडेगाव रस्त्याबाबत 20 एप्रिल रोजी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. रस्त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर अनेकांचा अपघात होऊन अपंगत्व आले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. यामुळे प्रशासन यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आत्मदहनाचा इशारा निवेदनातून मापारी यांनी दिला होता.तर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी परीसरातील नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काहीच हालचाली होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. शैलेश मापारी यांनी सोमवारी 6 वाजतापासून आंदोलन सुरु केले. यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे व पोलीस प्रशासन पोहचले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी गावात येऊन रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शैलेश मापारी यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सरपंच मंगेश तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.हिम्मतराव घाटोळ, राजवर्धन डोंगरे, राधेेेश्याम कळसकार, मोहम्मद अफतर,हनिफ भाई, अय्याज साहिल,अॅड सुबोध डोंगरे,अरुण पळसकर, सलीम, सचिन धनोकार,राजू अवचार, अंकुश शहाणे,राजू पळसकर,पठाण, मोहनसिंग लोध, गणेश मानकर,सागर सरप,सुश्रुत भुस्कुटे, श्रीकांत मसने,नितीन मानकर,किशोर अवचार,गजानन डोंगरे,सदानंद भुस्कुटे उपस्थित होते.