फेडरल बँकेने नागपुरातील रुग्णालयांना दिले दहा आईस लाईन रेफ्रिजरेटर

नागपूर : ११ मे – नागपुरातील शासकीय रुग्णालयांना दहा आईस लाईन रेफ्रिजरेटरचे (एनएबीएलद्वारे प्रमाणित) नि:शुल्क वितरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, नगरसेवक संदीप गवई, उपस्थित होते. फेडरल बँकेच्या वतीने हे रेफ्रीजरेटर वितरित करण्यात आले.
याप्रसंगी एव्हीपी व नागपूर क्लस्टर प्रमुख प्रमोद पी.बी, एव्हीपी व शाखाप्रमुख एस. जी. साबू, एमएस व शाखा प्रमुख सदर जॉबीन सी जोसेफ, नागपूर शाखेचे व्यवस्थापक योगेश वर्‍हाडपांडे, सौरभ गणवीर आदी उपस्थित होते. यावेळी आयएलआरचा तपशीर उपस्थित मान्यवरांना समजावून सांगण्यात आला. या वस्तू फेडरल बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून वितरित करण्यात आल्या. या वितरणाच्या कार्यक्रमात संदीप गवई यांचे मोलाचे योगदान आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 3 रेफ्रीजरेटर, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 2, एम्स हॉस्पिटलला 2, मनपाच्या हॉस्पिटलला 3 दिले जातील. सर्व 10 आयलर्सचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply