व्याघ्रप्रकल्पातील वाघाच्या पायाला झाली गंभीर दुखापत

चंद्रपूर : १० मे – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी बिटात एक नर वाघाच्या मागच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची बाब शनिवारी सायंकाळी उशिरा लक्षात आली. त्याच्यावर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. पण, सुधारणा झाली नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी या वाघाला नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक बी. एस. येळे यांनी दिली.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी बिटात वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना जवळपास 9 वर्ष वयाचा नर वाघ लंगडत चालताना त्यांना दिसला. तो कुठल्याही हालचाली वेगाने करू शकत नव्हता. त्याची शारीरिक हालचालही मंदावली होती. याबाबतची माहिती वरिष्ठ वनाधिकार्यांना देण्यात आली. त्यानंतर त्याला रात्रीच जेरबंद करून येथील तात्पुरत्या उपचार केंद्रात दाखल केले गेले. पण, पायातील दुखापतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याला नागपुरला हलविण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply