हडस हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी दिले दोन ऑक्सिजन काँसंट्रेटर

नागपूर : ९ मे – कोरोना संकटामध्ये अनेक रुग्णांचे ऑक्सिजन, औषधांविना मोठे हाल होत आहेत. प्रत्येक रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळावे, ऑक्सिजन अभावी कुणालाही जीव गमवावा लागू नये, या हेतूने हडस हायस्कूलच्या १९८५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी नागपूर महानगरपालिकेला दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर प्रदान केले. हडसचे माजी विद्यार्थी नरसिंह शर्मा, देवेन्द्र मत्ते, सचिन पाठक, शशांक ढेपे, पराग वानखेडे यांनी १९८५ बॅचमधील सर्व १८० विद्यार्थ्यांच्यावतीने दोन्ही ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.
यात हडसमय असलेला नरसिंह शर्माची खुप प्रबळ इच्छा होती की आपण या बिकट परिस्थतीत समाजासाठी काहीतरी करायला हवे. ही संकल्पना सर्वांनी उचलून धरली आणि अवघ्या पांच दिवसात पूर्णत्वास नेली. हा कार्यक‘म करण्यात पराग वानखेडे मोलाची भूमिका होती. ते एजी ऑफीसमध्ये कार्यरत आहेत पण सध्या त्यांच्याकडे मनपा कोव्हीड हॅास्पिटल च्या अंकेक्षणाची ची जबाबदारी आहे. तसेच उमेश महाजन आणि ओझोन रिसर्च आणि अप्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे राजेश आदमने यांनी टंचाईच्या काळात अतिशय माफक दरात दोन कॉन्सेन्ट्रेटर उपलब्ध करुन दिले. सामाजिक भावनेतून हडसचे माजी विद्यार्थी या भूमिकेतून 1985 च्या बॅचमधील सर्व 180 विद्यार्थ्यांद्वारे एकमताने या संकटाच्या परिस्थितीमध्ये मदत करण्याची संकल्पना मांडली. आपल्या शहरामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आपल्या पुढाकारातून काही फायदा होउ शकेल याचा आनंद आहे, अशी भावना यावेळी हडसच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या कार्यामध्ये समाजातील व्यक्तींकडून येणारे मदतीचे हात प्रशासनाला अधिक प्रेरणा देतात, अशा शब्दांमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व दानदात्यांचे आभार मानले.

Leave a Reply