सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

कलियुगी कृष्ण काका

काका तुम्हारे किस्से कितने? जिंदगी भर के फसाने जितने!
माननीय शरद पवारांवर लिहावे तितकं थोडं आणि प्रशंसा करता करता जीवातले प्राण निघुन जातील पण प्रशंसा पात्र मात्र भरणार नाही. इतके प्रशंसेचे धनी, परिस्थिती हाताळण्याची त्यांची हातोटी, समोरच्या मातब्बर प्रतिस्पर्ध्यांच्या पहेलवानांना काही सुगावा न लागु देता पटखनी देणारे, भर सभेत प्रतिस्पर्ध्याला सांगणारे की बाबारे, जी स्पर्धा तू भरविली आहे त्या स्पर्धेचा मी आॅर्गनायझर आहे, निकाल लागल्यावर-तुला निकालात कसे काढायचे हे मी ठरवणार….
असे न संपणारे काकांचे किती तरी किस्से आणि जो हारलेली बाजी जिंकत आणतो तो कृष्ण आणि कलियुगी जन्मला म्हणुन काका आपले कलियुगी चे कृष्ण. पण दोन कृष्णात जमीन अस्मानाचा फरक…
अदृश्य हाताने द्रौपदीला साडी पुरवणारा तो द्वापारयुगात ला श्री कृष्ण तर काका कलियुगी कृष्ण, आॅपरेशन च्या नावाने घरी बसून, फक्त मोदी द्वेषापायी ममता ला जिंकवून देणारा, अदृश्य हात असणारा कृष्ण.
द्रौपदीला वस्त्रे पुरवणा-या श्री कृष्णाला सगळ्यांनी क्रेडिट दिले की श्री कृष्णा तुने द्रौपदी ची लाज राखली.
मात्र कलियुगी कृष्ण काकांना, आव्हाड साहेबांनी फक्त ह्या कामाची पावती दिली. मात्र खुद्द ममता दीदींनी मात्र ह्या मदतीबद्दल चकार काढला नाही. आता त्या आपला “मुस्लिम राष्ट्र” अजेंडा चालवित आहे. त्यासुद्धा इतुक्या थोर आहे की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या घेतल्या साक्षात श्री अजित डोवाल ना परिस्थिती ची पाहणी करण्याचे आवतन आले.
काकांची थोरवी महान .. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचनं…….. कर्म करत जा, कर्माच्या फळाची आशा करत जाऊ नको, असा हा कलियुगी कृष्ण काका… हे असल्या अदृश्य हात वगैरे गोष्टींचे क्रेडिट आपल्याकडे कधीच घेत नाही, काकातील कलियुगी कृष्णाला त्रिवार वंदन.
मात्र काकांचे चाहते भक्त टीव्ही वर असल्या गोष्टींचा डांगोरा पिटायला कमी करीत नाही किंबहुना काकांनीच् त्यांना प्राय़ोजित कार्यक्रमाचे संचलन दिले आहे असा भास होतो.
आठवा तो महाभारतातील प्रसंग.. प्रत्यक्ष महाभारतातील युद्धाला श्री कृष्णा ला रणांगणात उतरावे लागले होते. असे म्हणतात तो युद्धाचा आवाज ज्याने सामान्य जनांचे कान फाटतील आणि युद्धाचा तो धुरळा आसमंतापर्यंत गेलेला ज्याने सुर्य सुद्धा झाकोळला गेला आणि रणांगणावर मृतांचा खच पडलेला.
आठवा तो दिवस १३ डिसेंबर १९९३ प्रायोजित बॉंब स्फोटांची मालिका जिथे हिंदू बहुल २९७ मृतांचा खच पडलेला, हे सगळे पाहुन कलियुगी कृष्णाचे हृदय द्रवलं नसतं तरच् नवल, तर आपले काका लगेच एका टीव्ही वर साक्षात्कार द्यायला सज्ज झाले.कलियुगी कृष्णंच तो हिंदू मुसलमानात भेद कसा करणार??????
काका टीव्ही तर साक्षात्कारासाठी अवतीर्ण झाले आणि तथ्य वदन केले की नुसते हिंदू बहुल क्षेत्रातच बॉंबस्फोट नाही झाले तर एका मस्जिद पाशी मुसलमान बहुल क्षेत्रात सुद्धा बॉंबस्फोट झाला आहे. कलियुगी कृष्णाला हिंदू-मुस्लिम एकोप्याची किती काळजी!!!!
तिकडे श्री कृष्णा ने नरोवा कुंजरोवा केले होते तद्वतच कलियुगी कृष्णाने धादांत खोटा साक्षात्कार द्यावा लागला. कसा नाही देणार धादांत खोटा साक्षात्कार????
हिंदू लोकांचे जीव घेणारा कर्ता करविता “दाऊद इब्राहिम” ह्याला नाराज करून कसे चालेल? म्हणून हा सगळा उपद्व्याप. त्यावेळी सुद्धा कलियुगी कृष्ण आपले सरकार – आपली पळवाट ह्या तत्वाने दाऊदला पाकिस्तान मध्ये जायला परवानगी दिली होती, असे ऐकिवात आहे. तो आजतागायत भारत सरकारचे हाती लागला नाही. दूरदृष्टी चा अप्रतिम नमुना म्हणावे लागेल, आपल्या काकांना अर्थात कलियुगी कृष्णाला.
असे कितीतरी किस्से रकानेच्या रकाने भरतील पण कलियुगी कृष्णाचे चारित्र्य अपुर्ण राहिल.
असे एवढ्यासाठी म्हणतो आहे की काकांचे थोडेसे किस्से बाहेर येतात. बाकी काकांबरोबर गुप्त परिस्थितीत सुप्तावस्थेत असतात, जे बाहेर येण्याची शक्यता ना के बराबर आहे.
कलियुगातल्या कृष्णाने भाजपाच्या फडणवीसाला “मी पुन्हा येईन” ही त्यांची आकांक्षा पूर्ण केली, त्यांना विधानपरिषदेमध्ये नेता ह्या नात्याने आत घेतले फक्त विरोधी पक्षनेते केले एवढेच.
म्हणजे जी तळमळ साक्षात श्री कृष्णा ला होती तसलीच मळमळ कलियुगी कृष्णाने जागती ठेवली, उगाच नाही लोकं काकांचा उदो उदो करीत. महाभारतात तर दिलेली नारायणी सेना पांडवांच्या विरूद्ध लढली तर इथे तर षंढी सेना भाजपा पक्ष्यात बसून, मोदींचे नावावर लढली आणि शेवटी भाजपाला विरोधात बसवले. रणनीती मध्ये अनितीची पराकाष्ठा म्हणजे हा कलियुगी कृष्ण.
असे कितीतरी किस्से आहेत कलियुगी कृष्ण काकांचे.
पण दोघांत अंतर आहे एकाने “गीता” प्रसवुन सामान्य जनतेला मार्ग दाखविण्याचे काम केले,जनता जनार्दनाला जीवन संपन्नतेचा मार्ग दाखविला तर दुस-याने कायदा तोडुन किंवा कधी कायद्यात राहुन स्वतः चा परिवार संपन्न केला.
श्री कृष्णा ची आज मंदिरं ची मंदिरं त्याच्या भजन पुजनात लीन असतात, तल्लीन असतात तर कलियुगी कृष्ण मात्र हीच् मंदिरं बंद ठेवून, सामान्य जनतेला वेठीस धरून – बार साठी पत्र लिहीतो, शेतक-यांना भीकेला लावतो – कलियुगी कृष्ण दहा वर्षे कृषी मंत्री होता. पण फक्त पोरीचे कल्याण केले – तिला शेतकरी उत्पन्न दहा कोटी रुपये- जनतेच्या भुकेशी खेळतो, सामान्य नागरिकांना असहाय करतो आणि स्वतः च्या टुम्मं भरलेल्या पोटावर भ्रष्टाचाराची परत च्या परत चढवतो (वाजे प्रकरण) आणि जनतेच्या पैशाची लुट करतो.
महाभारतातील श्री कृष्ण सा-या पृथ्वीवर प्राणवायू चा स्त्रोत आहे तर कलियुगी कृष्ण ह्या प्राणवायू वर महाराष्ट्रात ह्याचे राज्यात राजनिती चालू आहे.
महाभारतातील श्री कृष्णा ने वचन दिले आहे की हिंदू धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येईल, मी स्वतः हिंदू धर्म रक्षण करीन, तर आजचा कलियुगी कृष्ण मुस्लिम धार्जिणा आहे. हिंदू विरोधी आहे. आणि महाभारतातील श्री कृष्णा ने लवकरात लवकर जन्माला यावे ह्यासाठी व्यवस्थेला लागला आहे.
काका आम्हाला तुमच्याबद्दल नितांत आदर आहे, ह्या पोटी तुम्हाला आजच्या काळात, भगवान श्रीकृष्णाच्या जागी बसवून बघितले पण काका त्या जागेत, तुम्ही दिसतंच नाहीए, राजकारणातील तुम्हाला भलेही धुरंधर राजकारणी म्हणोत, पण ज्याची नियतंच् खोटी तो नेता खरे नेतृत्व काय असते? ह्याची पारख करु शकत नाही.
पैशाच्या जोरावर तुम्ही दोन चार स्वार्थी चेले चपाटे जोडु शकाल, स्वतः चे मोठ मोठे बॅनर टांगू शकाल पण सर्वसामान्य जनतेच्या हृदयात कधीच विराजमान होवु शकणार नाही. तो मान फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचा आहे, तो अजरामर आहे. तो निर्व्याज प्रेमाने भक्तीला पावतो आणि भक्ताची पाठराखण करतो. तुम्ही मात्र वाझे च्या माध्यमातून येणा-यांची फक्त पाठराखण करता.
भगवान के घर देर है अंधेर नही… ह्या उक्ती प्रमाणे कधी ना कधी काकांच्या कृष्ण कृत्यांचा हिशेब तर होणारच.
काका आतातरी सन्मार्गाला लागा …. महाभारतातील श्री कृष्ण तुमची वाट बघतोय, त्याच्या चरणी तुमच्या लीन होण्याची, पवित्र हृदयाने त्याचे समोर नतमस्तक होण्याची.

वीरेंद्र (भाई) देवघरे

Leave a Reply