वऱ्हाडी ठेचा …. अनिल शेंडे

मिलॉर्ड


मिलॉर्ड, क्या बात है !
आप सचमूच सबके बाप है !
अरे काय मस्त झोडपता हो तुम्ही सगळ्यांना !
कधी केंद्र सरकारला तर कधी राज्य सरकारांना ,
कधी याला तर कधी त्याला !
आणि निकाल देतांना तुमची टिप्पणी तर काय ! सिम्प्लि लाजवाब !
आणि कोणाची ताब आहे तुम्हाला विचारायची जाब ?
खूप खूप खूप सुखावतो आम्ही ती टिप्पणी ऐकून !
ऐकून वाटते ,कि बस आता फक्त आणि फक्त तुम्हीच आमचे तारणहार !
कधी कधी वाटते कि त्या
नायक सिनेमातल्या नायकाप्रमाणे
तुम्ही स्वतःच एक वर्षाचे का होईना पण बनावे पंतप्रधान !
आणि लावावे
त्या बदमाश महाभयंकर नरभक्षक
कोरोनासुराला पळवून !
आणि काढावे देशाला बाहेर
सर्वविनाशाच्या खाईतून !
ते जुने वर्षानुवर्ष तुंबलेले खटले बिटले जाऊ द्या हो खड्डयात !
न्याय लांबल्याने लोकं थोडेच मरतात !
कोरोनाला संपवायला तुमचं
पंतप्रधान होणं जास्त महत्वाचं !
खरंच ! खरंच ! खरंच !
व्हाच ! तुम्ही पंतप्रधान व्हाच !

   कवी -- अनिल शेंडे ।

Leave a Reply