चंद्रपूर : ९ मे – भिलाई येथून प्राणवायूचा पुरवठा करण्यासोबतच आपल्या स्तरावरून योग्य ती मदत करण्याचे आवाहन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी येथील ‘फेरो अलॉय’ उद्योग प्रबंधनाकडे केले आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने वाढत्या रुग्ण संख्येसोबतच रुग्णांच्या सुविधेतही गतीने वाढ होण्याची गरज आहे. त्यामुळे रुग्णांच्या सोई सुविधेसाठी आपल्या कंपनीच्या माध्यमातून भिलाई येथून द्रव्यरूप प्राणवायू जिल्ह्यातील रुग्णांसाठी आयात होत असल्याची माहिती दिली.
या प्रसंगी कंपनीतील ‘नायट्रोजन निर्मितीचा संच प्राणवायू निर्मितीत परावर्तीत करण्याच्या सूचनाही अहिर यांनी केल्या. याचबरोबर संचातील प्राणवायू सिलेंडर एसडीओ यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या सुचनाही केल्या. भविष्यात प्राणवायूची गरज पाहता कंपनी प्रबंधन स्वतंत्र प्राणवायू संच उभरण्याच्या दृष्टीने योजना तयार करीत असल्याने अहिर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी फेरो अलॉय उद्योगाचे ई. डी. झोडे, व्यवस्थापक शर्मा, चंद्रपूरचे एसडीएम घुगे, दिनकर सोमलकर उपस्थित होते.