अश्लील चित्रफीत काढून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा

नागपूर : ९ मे – नागपूर शहरातील जरीपटका पोलिस ठाणे येथे अत्याचाराची घटना पुढे आली आहे. आरोपीने फिर्यादीच्या कोल्ड्रिंकमध्ये बेशुद्धीचे औषध मिसळून अत्याचार केला. अश्लील चित्रफित काढून वायरल करण्याची धमकी दिली. शिवाय तिचा गर्भ पाडण्याचीही धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, ९ सप्टेंबर २0१९ ते १३ जानेवारी २0२१ दरम्यान, ३१ वर्षीय फिर्यादी व आरोपी मो. इरशाद इकबाल मिर्झा (वय ३३ वर्ष, रा. मेकोमाबाग, ख्रिश्चन कॉलनी, प्लॉट नंबर १२५, नागपूर) हे एकमेकांना दोन वर्षापासून ओळखत होते. ते एकमेकांशी फेसबुक व इंस्टाग्रामच्या मॅसेजद्वारे बोलत होते. दरम्यान, आरोपीने फिर्यादीस आपल्या घरी बोलावून कोल्ड्रिंकमध्ये औषध मिसळवून बेशुद्घ केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत अत्याचार केला. आरोपीने फिर्यादीचे अश्लील फोटो, व्हिडीओ काढून फिर्यादीस कोणाला काही सांगितल्यास व्हिडीओ वायरल करण्याची धमकी दिली. याव्यतिरिक्त आरोपीने फिर्यादीस गर्भवती करून तिचा गर्भ पाडण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम २७६ (१), ३७६ (२) (एन) ५0४, ५0 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply