वृद्ध महिला रुग्णाने तरुण रुग्णांसाठी सोडला बेड

जयपूर : ८ मे – देशभरात एकीकडे कोरोना काळात लोकांना माणुसकीचा विसर पडत आहे. तर दुसरीकडे या कठीण काळातही माणुसकी जपली जात आहे. राजस्थानमध्ये एका तरुणाला बेड मिळावा, यासाठी एका वृद्ध महिलेने तिचा बेड सोडल्याची घटना घडली. ही महिला स्वत: ऑक्सिजनद्वारे श्वास घेत आहे. मात्र तो तरुण कोरोनाग्रस्त असून त्याची तब्येत फार जास्त आहे. विशेष म्हणजे ती महिला व्हेलचेअरवर बसून बेड मिळण्याची वाट पाहात आहे. तर त्या तरुणावर सध्या उपचार सुरु आहे.
राजस्थानातील पालीत एक राणा नावाचे गाव आहे. या गावात ६० वर्षीय लेहर कंवर राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी बेड उपलब्ध नव्हता. जवळपास चार तास ओपीडीच्या व्हिलचेअरवर थांबल्यानंतर लेहर यांना बेड मिळाला.
पण तेवढ्यात त्यांची नजर एका तरुणाकडे गेले. एका गाडीमध्ये बसलेले 40 वर्षीय बाबूराम यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ते गंभीर अवस्थेत असून त्यांचा जीवन-मृत्यूशी लढा सुरु होतो. बाबूराव यांना गंभीर अवस्थेत बघून लेहर यांना पाझर फुटला. त्यांनी डॉक्टरांना संपर्क साधत स्वत:चा बेड त्यांना द्या, असे सांगितले.
मी माझे आयुष्य पाहिले आहे. माझी मुले देखील विवाहित आहेत. पण त्यांना लहान मुले आहेत. त्यामुळे आधी त्यांच्यावर उपचार करा. माझा बेड सध्या त्यांना द्या. मी अजून काही काळ व्हिलचेअरवर थांबू शकते, असे लेहर म्हणाल्या. विशेष म्हणजे लेहर यांनी बाबूराम यांना बेड देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांची ऑक्सिजनची पातळी ही 43 वर होती. त्यामुळे जर त्यांना वेळेत उपचार मिळाले नसते तर त्यांचा जीव वाचवणे अवघड झाले असते.

Leave a Reply