वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सलाम ! सलाम ! सलाम !

या अभूतपूर्व अशा महामारीच्या संकटकाळात
औषधांचा, प्राणवायूचा, जीवनावश्यक वस्तूंचा
काळाबाजार करणाऱ्या तमाम भडव्यांना सलाम !

रुग्णांच्या असहायतेचा, अगतिकतेचा फायदा घेऊन
त्यांना लुटणाऱ्या तमाम हॉस्पिटल्सना, अँबुलन्स मालकांना सलाम !

या काळाबाजारी आणि लुटीमधेही कमिशन खाणाऱ्या थोर थोर नेत्यांना आणि मंत्र्यांनाही सलाम !

मास्क न लावता बाईकवर चार चार जणांना बसवून
मोकाट फिरणाऱ्यांनाही सलाम !

बाजारात, दुकानात , विविध सोहळ्यात शरीरदुरीचा
फज्जा उडवणार्या महापुरुषांनाही सलाम !

कुठलीही भरीव कामगिरी न करता , घरातच बसून उंटावरून शेळ्या हाकलणाऱ्या ,आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या भयंकर कर्तृत्ववान मामुन्नाही सलाम !

     सलाम ! सलाम ! सलाम ! 
उठून , लवून , वाकून , पुन्हा पुन्हा सलाम !!

कवी — अनिल शेंडे

     

Leave a Reply