कंगना राणावत झाली कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : ८ मे – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या जगभरात पुन्हा एकदा हाहाकार माजला आहे. देशात सतत वाढत असलेल्या कोरोना केसेस दरम्यान आता बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत देखील कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. कंगनाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिने स्वतः ही माहिती सोशल मीडियाच्या माधमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच तिने स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. सध्या ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच उपचार घेत आहे.
कंगना रनौतने ही माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली. तिने एक फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये ती ध्यानधारणा करताना दिसत आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मागील काही दिवसांपासून मला खूप थकवा आला होता आणि माझे डोळे देखील जळजळत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती आणि आज त्याचा निकाल आला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. हे काळातच मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हते. आता मला माहित आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन.’

Leave a Reply