सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

ट्रींग ट्रींग ट्रींग…. बराच वेळ फोन वाजला पण उचलल्या नाही गेला.
फोन करणा-याने नंबर बदलला, फोन लावला ट्रींग ट्रींग फोन उचलला, हॅलो मी शरद पवार, कसा काय फोन केला,डॉ. तेद्रोस घेब्रेयेसुस (WHO – Director General) डॉ. तेद्रोस म्हणाले – अरे उद्धवला फोन लावतोय पण तो उचलत नाही. म्हटलं तुम्ही सांगा त्याला. मला ताबडतोब बोलायचे आहे त्याच्याशी.
श.पवार – आज काल तो माझेपण फोन उचलत् नाही. मी सांगतो संजयला, उद्धव उचलेल फोन. नाही उचलला तर कळव मला. त्याला आता तसाही मी आपटणारंच् आहे. माझा पुतण्या बहात्तर हजार कोटी खाऊन, धरणाचं अख्ख पाणी खारं केलं पण ताब आहे कोणाची त्याला पकडायची? अन् ह्याने शंभर कोटी साठी मला घरात डांबून घ्यायला लावले. ह्याला तर मी आपटणारंच् आहे. फोन कट.
पाच मिनिटाने डॉ. तेद्रोस ने उद्धव ठाकरे ना फोन लावला.
उ.ठा. – मी उद्धव नमस्कार डॉ. तेद्रोस
डॉ. – WHO साठी थोडं मार्गदर्शन पाहिजे होते.
उ.ठा. – बराच उशीरा फोन केला डॉक्टर. बरंच् पाणी वाहून गेले आणि तुम्हाला आत्ता जाग आली मार्गदर्शन घेण्याची. बोला काय हवंय?
डॉ. तेद्रोस – कोरोनाचे सगळ्यात मोठे म्युटेशन कुठले?
उ.ठा. – कोरोनाचे सगळ्यात मोठ्ठे म्युटेशन म्हणजे जेव्हा शिवसेनेनी राकॉ आणि कॉंग्रेस बरोबर सरकार बनविले, ते कोरोनाचे सर्वात मोठ्ठे म्युटेशन आहे.
डॉ.तेद्रास – कोरोनाचे आतापर्यंत किती म्युटेशन्स झाले आहेत?
उ.ठा. – आता जसे उत्तर प्रदेश मध्ये अगदी सुईएवढी घटना घडली तर आमचा संजय लगेच सकाळी सकाळी तोंडात ब्रश, हातात मग्गा घेवुन टीव्ही वर अवतीर्ण होतो, सांगायला की घटना किती मोठी आहे आणि त्याने जनमानस कसे ढवळून निघाले. ह्याचे प्रदीर्घ परिणाम जनतेला भोगावे लागतील वगैरे वगैरे आणि हमखास लक्ष ठेवा की मग्ग्यातील पाणी गरमंचं पाहिजे. कोरोनासाठी….
तेच बंगालमध्ये इलेक्शन झाल्याबरोबर ममता बाईची माया अजुन काय? आता काही हिंदू ची घरं जाळली, हिंदू घर सोडून जायला मजबूर झाले, दुकाने लुटली हिंदूंची. सगळं ममता बाईंनी केलं पण आमचा संजय काय सांगतो? टाळी एका हाताने वाजत नाही. ह्याला कोरोनाचे छोटे मोठे म्युटेशन्स म्हणतात.
असे कोरोनाचे म्युटेशन्स आतापर्यंत जवळपास १५० चे वर आहेत.
डॉ. तेद्रास – पण आमची युरोपात आलेली दूसरी लाट कशी नियंत्रित करायची? ह्या बद्दल काही मार्गदर्शन किंवा उपाय सुचवावा एखादा.
उ.ठा. – आपल्याला ही लाट रोखावीच लागेल, कोरोना आपल्यापर्यंत नाही आला तर आपल्याला कोरोनापर्यंत जावे लागेल, किंबहुना कोरोनाला म्हणावं लागेल ये माझ्या अंगावर घाबरतोय का तुला? घुस माझ्या लुसलुशीत अंगात दोन दोन डोस घेवून मी लसलसीत झालो आहे. मग कोरोना घाबरून पळुन जाईल. पण हा उपाय युरोपात उपयोगी, तिथे माणसाच्या जीवाला प्राधान्य देतात.
डॉ. तेद्रास – युरोपातील समाधान दिल्याबद्दल धन्यवाद. पण तुम्ही भारतात खास करून तुमच्या महाराष्ट्रात काय उपाय योजना करणार?
उ.ठा. – अगदी अपेक्षित प्रश्न डॉ अगदी कसुन तयारी करुन आले दिसताय, प्रश्नांची.
जसे युरोपात तुम्ही माणसाच्या जीवाला प्राधान्य देतात तसे महाराष्ट्रात सरकार भ्रष्टाचार, वसुली, लशीचा काळाबाजार, खोट्या नावाने बेड अडवून, ख-या पेशंट पर्यंत आॅक्सिजन न पोहोचु न देणे, मिडिया मॅनेज करणे आणि खोटे आकडे प्रसारित करणे. अशा गोष्टींना आम्ही प्राधान्य देतो. आणि अशा काळात मुख्यमंत्र्याला काहीच् करायचे नसते, फक्त घरात बसायचे असते अराजक माजु द्यायचे असते. ज्यांच्यावर बितते तेच् लोकं आपापली व्यवस्था करीत असतात. ब्लॅक मध्ये लस, आॅक्सिजन, डॉक्टर, बेड, हॉस्पिटल वगैरे वगैरे आपल्या नातेवाईकांचा जीव वाचवित असतात. राज्यकर्त्यांचे काम म्हणजे फक्त घरात बसणे मोदींच्या नावाने खडे फोडणे आणि घरी आलेले पैसे मशीन लावुन मोजणे. तरी वाईट वाटते डॉक्टर की एक पैसे मोजायचे मशीन आमचे एनआयए ने जब्त केले….
किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र मोठ्याने अलार्म वाजला आणि झोपमोड झाली… अरेच्चा मुख्यमंत्र्यांनी तर लॉकडाऊन लावले आहे , चला म्हटले झोपु परत आता……

भाई देवघरे

Leave a Reply