सडेतोड

अध:पतन मराठा आरक्षणाचे

आदर्श मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे आदर्श पुत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळ्यात असलेल्या सहभागाने, न्यायालयाने आदर्श निर्णय दिला आणि आदर्श घोटाळ्यात दोषी आदर्श मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भ्रष्टाचाराचा आदर्श ठेवीत, राजीनाम्याचा आदर्श ठेवला आणि आदर्श पद्धतीने पायउतार झाले.
असो, सद्यपरिस्थितीत मराठ्यांचा आदर्श- अशोक चव्हाण.
मराठ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले आणि एकच हल्लकल्लोळ जाहला. मविआ ची भविष्यातील बेगमी, रसद संपते का काय? ऐसे जाहले. देवेंद्र ने दिले आरक्षण आम्हा फुका दवडविले, ऐसे वाटु लागले.
मविआ सरकार ने घातलेला वेढा शिथिल पडला आणि ऐसे समयोचित अवस्था लाभली असता, हा आदर्श प्राणी सोबतीला दाढीदारी प्राणी नवाब मलिक आणि स्री, अबला नारीस शिव्या दिल्याने तोंडाने काळा ठिक्कर पडलेला असामी ह्यांना सवे घेत, पत्रकार परिषद घेण्यास अवतीर्ण झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेली ३०० वर्षे जुनी फौज, आता ३०० वर्षांनंतर थकल्याचे स्पष्ट जाणवत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे काळात ह्यांच्या मनगटात जोर होता, प्रत्येक लढाई डावपेचाने जिंकत, राज्य विस्तार, किल्ले विस्तार, पौरूषेय मर्दुमकी,
आणि कट- कारस्थानात वर आपल्या कट कौशल्याने मात करीत साम्राज्य विस्ताराचे काम करणारे मावळे, छत्रपतींसाठी जीवाच् रान करीत, स्वतः च्या घरादाराची पर्वा न करता एक बलाढ्य , स्वाभिमानी साम्राज्य छत्रपतींनी उभे केले तीनशे वर्षांपूर्वी.
कालानुपरत्वे शनै: शनै: मराठा कर्तृत्व उणे होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वाभिमानी मावळे उभे केले ते कालानुरूप मावळले, स्वाभिमान आमदारकीच्या खुर्चीत विरला, मुख्यमंत्री पद मिळावे ह्यासाठी ह्या मराठा समाजाच्या निष्ठा बदलल्या.
ज्या औरंगजेबाला छत्रपतींनी झुंज दिली, आज त्या दाढीसमोर मराठ्यांच्या माना वाकल्या, ज्या सोनिया ला साथ देणा-या ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे षंढ, छक्के म्हणाले होते – त्या यादीत दस्तुरखुद्द त्यांच्या पुत्राचे नाव आले.
“अशीच अमुची आई असती सूंदर रुपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो” वदले छत्रपती.
आता त्याच मराठा राजवटीत स्त्रिया सुरक्षित नाही. धनंजय मुंडे, राठोड राज्यकर्ते स्वतः दोन दोन तीन तीन पोरी रखेल म्हणून ठेवतात आणि असल्या प्रकरणाने त्रास झाल्यावर काटा काढावा त्याप्रमाणे पोरींचा जीव काढतात.
अध:पतन किती व्हावे? छत्रपती शिवाजी महाराज – हा तुमचा मराठा समाज आहे? ज्या मराठा समाजाने स्वतः चे वेगळे अस्तित्व अधोरेखित करून विश्वाला आदर्श घालून दिला होता की मराठा समाज स्वतः राज्य उभे करु शकतो, शककर्ते शिवराय अशी ख्याती प्राप्त करु शकतो. स्वतः आदर्श राज्याची संकल्पना नव्हे तर प्रत्यक्ष रामराज्य चालविण्याची क्षमता असलेला मराठा समाज आज “आरक्षणाची” भीक मागतोय.
गंमत इथेच थांबत नाही साहेब, आजच्या मराठा समाजाला कायद्याची समज असु नये, ही दारुण शोकांतिका आहे. आज राज्य करणारे महाराष्ट्र मविआ मराठा सरकार एक साधी आरक्षणाची केस जिंकु नये?
ही वैषम्याची बाब आहे. प्रत्येक गोष्टीसाठी ह्यांना केंद्र सरकारची मदत लागते अगदी कोरोना काळात प्राणवायूचा टॕंकर नेणा-या ट्रकसाठी चालक सुद्धा ह्यांना आणता येवु नये, अशा अध:पतनी व्यवहाराला हा मराठा समाज मोठेपणाची झालर देवुन स्वतः ला धन्य समजु लागला.
आज तर कहर झाला आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी सर्व मावळे महाराष्ट्र राज्य करणा-या मराठा राज्यकर्त्यांच्या माना कापण्यात लावले असते.
कौशल्य आणि कर्तबगारीला फाटा देत मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून मिळवलेली सत्ता, मतदारांचा विश्वासघात करीत मिळवलेली सत्ता आणि मुख्य म्हणजे हिंदू तत्वांशी तडजोड करीत मिळवलेली सत्ता – छत्रपती शिवाजी महाराजांना कधी भावली असती???????
कधीच नाही छत्रपती !!!!!!! शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करावयाचे आणि वाझे, परमबीर सिंग, १०० कोटी वसुली असले – जनतेला त्राहि माम माजकारण – पटले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याना?????
कधीच नाही, इतका प्रचंड नावलौकिक कमावलेला मराठा समाज, कोर्टातील आपली स्वतः ची केस जिंकु शकत नाही आणि मराठा समाजाची अधोगती आणि पतन तर बघा, आपली नाडी सावरायला, हिंदू मराठा आदर्श माजी मुख्यमंत्री आपण घातलेला बांडा पायजामा सुटायला नको म्हणून स्वतः चा नाडा सांभाळायला पत्रकार परिषदेत एक दाढी धारी आणि एक जळक्या तोंडाचा स्त्री शिलावर शिंतोडे उडवणारा ( म्हणून हा जळक्या तोंडाचा), ह्यांना सोबत घेवून हे सांगायला बसतो पत्रकार परिषदेत की आम्ही भरपूर मेहनत घेतली म्हणून हारलो आता मोदी, राष्ट्रपती, केंद्र सरकारने, दीन – दीन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. त्यावेळी असे वाटते छत्रपती शिवाजी महाराज उगीच तुम्ही मराठा समाजाला एवढे मोठे केलात. आरक्षण मिळत नाही म्हणून ह्या मावळ्यांनी आपल्या माना न्हाव्याच्या समोर तुकवुन, निषेधार्थ केव्हाच आपला चमनगोटा केला आहे.

वीरेंद्र (भाई) देवघरे
9660888664

००००००००००
जितेंद्र आव्हाड
एकच् आवई उठवली गेली, बंगाल अदृश्य हात आणि आव्हाडांनी ती अलगद उचलली. अर्थात शरद काका आमचं दैवत. काकांच्या पोटातलं पाणी पण हालत नाही, ते काय करतात ते ह्या कानाचं त्या कानाला कळत नाही. ह्या हाताचं त्या हाताला कळत नाही. त्यांचं सगळं गुप्त असतं त्यांचं की मला वाटतं की दवाखान्यात अॅडमिट झाल्यावर त्यांना काय झालं हे सगळं शरद काका ठरवतात आणि डॉक्टर त्यांच्यासमोर वही पेन घेऊन त्यांना विचारत असावा, शरद काका काय लिहायचं तुमच्या फाईल मध्ये. मग काका सांगत असावेत बाबा रे सध्याचा कालावधी दहा दिवसांच्या नौटंकीचा आहे, पण कालावधी वाढु शकतो त्याप्रमाणे तुला पुढले मागले, खालचे वरचे काय आॅपरेशन टाकायचे, ते तू ठरव.
मात्र शरद काका इमर्जंसी मिटींग्सना घरी सर्वांसाठी हजर असतात, जसे देशमुख प्रकरण.
तर अशी अतिशय गुप्त पद्धतीचे सिक्रेट राजकारण करणारे अदृश्य शरदाचे हातांनी बंगालातली दीदी जिंकली आणि पवार किती पॉवरफुल आहेत हे सर्व वाहिन्यांवर प्रसारित करण्याचे आव्हान आव्हाडांनी स्विकारले. आणि पवारांचे प्रचंड गुणगान करीत आव्हाडांनी सर्व जगाला पोवाडे गाऊन गाऊन गाजत वाजत सांगितले.
बरे ममता दीदी चकार शब्द काढत नाही की अदृश्य हाताने साथ दिली म्हणून आणि सारे पक्ष मात्र ,”बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना और दीदी की जित मे सारे बन गए शकिना!
मात्र आव्हाड स्वतः च्या पक्षाचे पंढरपूर आणि बेळगाव वर मात्र चकार काढत नाही.
इतकी चुरशीची, काट्याची, नाकाची टक्कर असुन सुद्धा आव्हाड ब्र काढत नाही.
विचारलं म्हणताहेत तिथे त्यांचे दृश्य, प्रत्यक्ष हात आहेत. आणि शरद काकांचा इतिहास उघडून बघा, त्यांचा ५०-५३ उमेदवार जिंकण्याचा, महाराष्ट्रवाला पाच वर्षांचा कोटा पुर्ण झाला आहे आणि आता बाकी महाराष्ट्रात दीड वर्ष झाले आहेत सत्तेला ही तर काकांची पलटी मारायची वेळ झाली आहे तर आमचा उमेदवार जिंकला काय आणि हारला काय? सगळं काकांना कळतं, आव्हाड म्हणतात आपल्याला नाही कळंत.

वीरेंद्र (भाई) देवघरे
9660888664

Leave a Reply