वऱ्हाडी ठेचा – अनिल शेंडे

स्वप्न भंगले उषःकालचे
फिरून आली रात्रच काळी !
वाट पहाता श्रीकृष्णाची
पुन्हा आली ती पुतना भाळी !

बाग जयाच्या होता हाती
तोच स्वहस्ते त्याला जाळी!
विपरीत हे पाहुनिया सारे
बंग भूमी ही अश्रू ढाळी !

अता लांडगे मुक्त उधळले
रानच अवघे तयां मोकळे !
रामभक्त हिंदूंच्या नशिबी
बघणे आले मृत्यू सोहळे !

जोवर हिंदू एक न होतील
असेच हे भूभागही तुटतील!
ओल्या जखमा फाळणीच्या त्या
पुन्हा पुन्हा रे ओल्या होतील !

कवी — अनिल शेंडे

Leave a Reply