अकोला : ६ मे – अकोला येथील शासकीय वैधकीय महाविद्यालयातील करोना रूग्णांना सेवा देणारे आंतरवासीता डॉक्टरांनी आपल्या काही प्रमुख मागण्यासाठी काल पासून सुरू केलेले आंदोलन ६ मे रोजी अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी काही मागण्या मान्य केल्याने तुर्तास मागे घेऊन संपावर जाण्याचे रद्द केले आहे.
करोनाच्या लढ्यात रुग्णसेवामध्ये सक्रिय सहभागी शासकीय वैद्यकीय महािवद्यालयातील प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांच्या मागण्या मंजूर होत नसल्याने या डॉक्टरांनी संपाचीही हाक दिली होती. दररोज १२ तास रुग्णसेवा करुन केवळ ३६० रुपये मिळणारे मानधन त्यातच नसणारे विमा कवच आणि न झालेले लसीकरण हा अन्याय असल्याचे मत या डाॅक्टरांचे होते.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावात उपचारासाठी डाॅक्टर व प्रशिक्षित डाॅक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे कोरोनािवरुद्धच्या लढाईत प्रशिक्षणार्थी डाॅक्टरां काम करीत आहेत. त्यात १३४ आंतरवासीता डाॅक्टरांचा समावेश आहे. दरम्यान बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांनी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत घोषणा दिल्या. आंदोलना दरम्यान आंतरवासीता डॉक्टरांच्या काही मागण्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये यांनी मान्य केल्या. यात प्रामुख्याने आंतरवासीता डॉक्टरांना एन ९५ मास्क देणे, रुग्णसेवे दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या आंतरवासीता डॉक्टरांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देणे, कोविड लस उपलब्ध करुन देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या शिवाय, कोविड भत्ता वाढविण्यासंदर्भात संचालनालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आंतरवासीता डॉक्टरांना देण्यात आल्याने हा संप आंतरवासीता डॉक्टरांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले.