सडेतोड

(ख्यातनाम स्तंभलेखक वीरेंद्र (भाई) देवघरे हे आता पंचानामासाठी सभोवताल घडणाऱ्या घटनांवर विनोदी ढंगाने भाष्य लिहिणार आहेत. आज त्यांची अशी दोन भाष्य आम्ही वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. )

अरविंद सावंत साहेब, कशापायी भाजपाची उणीदुणी काढताय?
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना कुठे?
हिंदू हृदय सम्राट दूरदृष्टीने एक एक पाऊल टाकत तर आजच्या शिवसेनेने सोन्याचं अंडं मिळतं म्हणून अख्खी कोंबडी कापली.
आणि भाजपा दुर्बीण ने…… वगैरे शब्दप्रयोग शिवसेना करु शकते. कारण शिवसेनेला कोणाला काहीही बोलण्याचे, शिवीगाळ करण्याचे, दुर्बलावर अत्याचार करण्याचे लायसन्स मिळाले आहे.
तर सावंत साहेब खुप मागे जाऊन पाहण्यापेक्षा थोडंसंच् समोर बघुया.
समोर जर ही सत्ता गेली तर शिवसेनेला परत आपल्या पायावर चालायला कमी त् कमी २५ वर्षे लागतील.
ज्या काकांना समजायला १०० वर्षे लागतील म्हणाला होता आपला संपादक ते काका दीड वर्षात शिवसेनेला गाशा गुंडाळायला लावतील.
ही शिवसेना काही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील इमानदार शिवसेना नाही.
काकांनी एकदा पलटी मारली की शिवसेनेची शकलं सुक्ष्मदर्शिकेखाली सुद्धा शोधून सापडायची नाही.
सावंत साहेब, हा काळ फार तर महिना दीड महिना – शिवसेना जमीनदोस्त.
तुम्हाला एक सजेस्ट करतो, इतर पक्षांशी पंगे घेण्यापेक्षा राष्ट्रवादी, कॉंग्रेस , भाजपा कुठंतरी जुगाड लावुन ठेवा. ज्यावेळी शिवसेना सुक्ष्मदर्शिकेखाली शोधुन पण सापडणार नाही त्यावेळी पलटी मारायला, एखादा पक्ष हातात ठेवा.

वीरेंद्र (भाई) देवघरे

०००००००००००००

काकांच्या “कळण्याला” आता कळ लागली आहे. आणि काकांना सामान्य जनतेचा कळवळा तर नाही च् नाही.
उगाच नाही काका तीन तीन ऑपरेशनच्या नावाखाली तोंड लपवून बसले आहेत. मिडिया समोर येण्याचे धाडस गमावण्या-या नेत्याला, तुम्ही काय म्हणाल?
देवेंद्र फडणवीसनी जे काही वाझे आणि फोन टॅपिंग प्रकरणात सगळ्यांना कायद्याने गुंतवून ठेवले आहे तो गुंता सोडवता सोडवता, सरकार पडणार, शिवसेना धारातीर्थी पडणार आणि मविआ औट घटकेचं राज्य म्हणायला हरकत नाही.
दूरदृष्टी कोणाची? फडणवीसाची का काकाची?
काकाची कुरघोडी करीत त्यांना स्वतः ला स्वतः च् बंदिस्त करून घ्यावे लागले, ह्यापेक्षा सुंदर खेळी राजकारणात कुठली असु शकते? पुन्हा परत या फडणवीस, महाराष्ट्र राज्य चालवणं काही शेंबड्या, घरघुश्या घरकोंबड्याचं काम नाही.
जनसामान्यांच पैसा न खाता, जनांचे भले करण्याचा जिगर ह्या सरकार पाशी नाही आणि ह्या सरकारकडून कोणतीच् अपेक्षा पण नाही.

वीरेंद्र (भाई) देवघरे

Leave a Reply