युवकाचा खून केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक

भंडारा : ५ मे – जुन्या वैमन्यस्यातून युवकाचा धारदार शस्त्राने खून करणार्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि वरठी पोलिसांनी तासाभरात अटक केली. ही घटना रात्री १0 च्या सुमारास वरठी येथे घडली.
वैभव सुमेश नगराळे (२४) रा. नेहरु वॉर्ड, वरठी असे मृतकाचे नाव आहे. तर जोशेल शिंदे, जयेश शिंदे व बब्बू गफ्फार शेख सर्व रा. हनुमान वॉर्ड, वरठी अशी आरोपींची नावे आहेत.
वैभव नगराळे हा वरठी येथील घरफोडीतील गुन्हेगार असून वरठीतीलच एका टोळीचा सदस्यदेखील होता. जयेश शिंदे याच्यासोबत त्याचे २ ते ३ महिन्यांपूर्वी यांचे भांडण झाले होते. त्यामध्ये आरोपी जयेश याच्यावर वार करून त्यास अपंग करण्यात आले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात खदखदत होता.
वैभव नगराळेचा वाढदिवस असल्याने तो आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यास गेला. परतताना जयेश व वैभव यांचे भांडण झाले. जवळ असलेला जयेशचा भाऊ जोशेल शिंदे व मित्र बब्बु गफ्फार शेख यांना त्यांच्यातील भांडण पाहिले जात नव्हते. त्यात जुने वैमन्यस्याचा राग म्हणून जोशेल याने घरात ठेवलेला धारदार चाकू जाऊन आणला आणि वैभव नगराळे याच्या छातीत खुपसला. जखमी अवस्थेत वैभव पळून जात असताना तिनही आरोपींनी पुन्हा त्याचा पाठलाग करुन गळ्याशेजारी व पाठीत पुन्हा चाकुने सपासप वार करुन त्याला जिवानीशी ठार केले.
वरठी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कामगिरीने आरोपींना तासातभरात अटक करण्यात आली. जोशेल शिंदे, जयेश शिंदे व बब्बु गफ्फार शेख या आरोपींना अटक करुन सखोल विचारपुस केली असता त्यांनी वैभव सुमेश नगराळे याचा खुन केल्याची कबुली दिली.

Leave a Reply