पश्चिम बंगालमधील हिंसाचार हे लोकशाहीवरील संकट – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ५ मे – पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर राज्य सरकारच्या पाठिंब्याने मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. या घटनांमुळे लोकशाहीवरच संकट आले आहे. मात्र या हिंसाचाराबाबत विचारवंत ,पत्रकार मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ नागपूर येथे झालेल्या निदर्शनात सहभागी होताना मा. फडणवीस बोलत होते. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके,आमदार विकास कुंभारे,यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, या प्रसंगात देशभरातील भाजपा कार्यकर्ते पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. न्यायालये या हिंसाचाराची नक्कीच दखल घेतील, असा मला विश्वास आहे.

Leave a Reply