नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा आजार जडला आहे – देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

नागपूर : ५ मे – ‘मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ज्या याचिका टाकल्या जातात त्या राष्ट्रवादी पुरस्कृत आहे. यासाठी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठका देखील झाल्या असून नवाब मलिक यांना खोट बोलण्याचा रोग जडला आहे’, असा पलटवार भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केला आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
‘मागच्या 50 वर्षात यांच्या सरकारनं जे करू शकले नव्हते ते आम्ही करून दाखवले होते. हे मराठा आरक्षण टिकले तर याचे भाजपला त्याचे श्रेय जाईल म्हणून आघाडी सरकारने योग्य भूमिका मांडली नाही व या आरक्षणाचा मुडदा पडण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
‘देवेंद्र फडणवीस यांची आठवण आरक्षण टिकले नाही तेव्हा आली त्या आधी एकाही बैठकीत बोलावले. आम्ही असतो तर सर्वोच्च न्यायालयात योग्य समन्वय घडवून आरक्षण टिकवून ठेवले असते, असा दावा
तसंच, ‘मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ज्या याचिका टाकल्या जातात त्या राष्ट्रवादी पुरस्कृत आहे. यासाठी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठका देखील झाल्या असून नवाब मलिक यांना खोट बोलण्याचा रोग जडला आहे’ असा टोलाही फडणवीसांनी मलिक यांना लगावला.
‘देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल केली. राज्याला अधिकार नसताना कायदा केला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपने पाठबळ दिले आहे. जी लोकं सरकारच्या विरोधात याचिका टाकत आहेत, त्यांनी मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयाविरोधात याचिका केली, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.
‘102 घटना दुरुस्ती केली होती त्यामध्ये 2018 मध्ये नवीन कलम लावण्यात आले आहे. संसदेत चर्चा होत असताना यावर सर्वांनी आक्षेप घेतला. ही चर्चा करत असताना कुठे राज्याचे अधिकार हिरावून घेत आहात हे सांगण्यात आले. आज सुप्रीम कोर्टाने याच निर्णयावर बोट ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला. ‘या निकालानंतर आता केंद्राची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने आता कायदा पारीत करून मराठा समाजाला न्याय द्यायला पाहिजे. केंद्राकडून अजून मागासवर्गीय समिती स्थापन करण्यात आली नाही. ती लवकरात लवकर स्थापन करावी, आम्ही त्या समितीकडे मागणी करू, असं मलिक यांनी सांगितले.

Leave a Reply