अमरावती : ४ मे – परतवाडा शहरातील छोटा बाजार परिसरात दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास हल्लेखोरांनी विकी पवार (वय ३२) रा. रविनगर परतवाडा या युवकास धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार दुपारच्या सुमारास छोटा बाजार येथील जनरल स्टोअरजवळ अज्ञात आरोपी व विक्की पवार यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद झाला. आरोपीने धारदार शस्त्राने विक्कीच्या गळ्यावर, पोटावर, माडीवर वार केले. तेथेच त्यांचा मृत्यु झाला असल्याचे सांगण्यात येते. नागरिकांनी पोलीसांना माहिती दीली. परतवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता विक्की रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. विकी पवार हा नगरपरिषद सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू केला आहे. आरोपी एका पेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत असून आरोपी घटनास्थळावरून पसार झालेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरात अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर संध्याकाळी परतवाडात पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसत होता.
परतवाड्यात भरदिवसा केली तरुणाची हत्या
- Post author:Panchnama
- Post published:May 4, 2021
- Post category:विदर्भ
- Post comments:0 Comments