गट्टू बनविणाऱ्या कारखान्याला लागली आग, ४ कोटींचं नुकसान

वाशीम : ४ मे – वाशिम जिल्ह्यातील मुंगळा शेत शिवारात असलेल्या बबन विसपुते यांचा शेतातील कुटारापासून बनविण्यात येणाऱ्या गट्टू कारखाना आहे. या कारखान्याला सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये कारखान्यातील सर्वच साहित्य जळून खाक झाले असून ४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मात्र, सुदैवानं यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नाही. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला असून ५ तासाच्या प्रयत्ना नंतर १० वाजता आग आटोक्यात आली आहे. मात्र आग नेमकी कशाने लागली याचं कारण कळू शकले नसून, या आगीत कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply