चंद्रपूर : ३ मे – आज सोमवार दि. ३ एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास वनपरीक्षेत्र अधिकारी (बफर) नायगमकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरात अस्वल फिरत असल्याची माहीती संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी लगेच तेथील स्थानीक वनकर्मचारी व वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर यांना देण्यात आली व आर. आर. टी. पथक ताडोबा यांच्या मदतीने एक तासाच्या आत अस्वलाला बेशुध्दीचे इंजेक्शन देऊन सुरक्षीतपणे पकडण्यात आले.
सदर अस्वल हे नेहमी रेल्वे स्टेशन परिसर, कर्मवीर महाविद्यालय परिसर, उपजिल्हा रुग्णालय परिसरात रात्रीच्या दरम्यान फिरताना बऱ्याच लोकांनी बघितले होते. यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर, टी. टी. सी.चे डॉ.पोडचलवार, आर. आर. टी. ताडोबाचे अजय मराठे व टीम, क्षेत्र सहाय्यक खनके, वनरक्षक मरसकोल्हे, वनरक्षक गुरनुले ,विषेश व्याघ्र संरक्षण दलाची टीम व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, स्वप्निल आक्केवार, दिनेश खेवले, अंकुश वाणी, संकल्प गणवीर, प्रतीक लेनगुरे, यश मोहुर्ले उपस्थीत होते. परिसरातील नागरीकांनी कोणालाही कोणत्याही प्रकारची हानी न पोहचविता अस्वलाला जेरबंद केल्याबद्दल वन विभागाचे आभार मानले.