नागपूर : ३ मे – मेडिकल रुग्णालयातील दोन्ही लसीकरण केंद्रांवर सोमवारी ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू असले तरी लसींअभावी शहरातील इतर लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्पच होते. लसींची खेप आणखी १-२ दिवसांनी येईल, असे ठाम नव्हे तर शक्यता व्यक्त केली जात आहे.
मेडिकल रुग्णालयातील दोन्ही केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. सकाळी ८ ते ३ व दुपारी ३ ते १० या दोन पाळीत येथे लस दिली जात असून प्रत्येक पाळीत १ केंद्र प्रमुख, ४ डॉक्टर्स, ४ परिचारिका, ३ संगणक परिचालक कार्यरत असतात. १६ जानेवारीपासून रविवारी रात्रीपर्यंत या दोन्ही केंद्रांवर पहिली मात्रा ६० वर्षांवरील २६०० पुरुष, २०६१ स्त्री, ४५ ते ६० वयोगटातील १६६१ पुरुष, स्त्री १६६२, आरोग्य सेवक पुुरुष २१२७, २३४४ स्त्री, फ्रंटलाईन वर्कर्स पुरुष २१२७, ८७ स्त्री आदींनी घेतली आहे. दुसरी मात्रा ६० वर्षांवरील ८५६ पुरुष, १४४५ स्त्री, ४५ ते ६० वयोगटातील ५५१ पुरुष, स्त्री ७३१, आरोग्य सेवक पुुरुष १४३४, १७२१ स्त्री, फ्रंटलाईन वर्कर्स पुरुष १२७, ३९ स्त्री आदींनी घेतली आहे. आतापर्यंत या दोन्ही केंद्रांवर एकूण २१६९६ लसीकरण झाले आहे.
मेडिकल रुग्णालयातील दोन्ही केंद्रात २८ एप्रिलला लस संपल्याने लसीकरण बंद पडले होते. परवा सकाळी ८०० मात्रा मिळाल्याने त्यातून ४५ वर्षांवरील दुसरी मात्रा घेणाèयांना लसीकरण सुरू झाले. सोमवारी दिवसभर नागरिकांचा ओघ बèयापैकी असल्याने मंगळवारपर्यंत शिल्लक राहण्याची शक्यता कमीच होती. १ मे पासून १८ ते ४४ वर्षांतील नागरिकांनाही लसीकरणाची घोषणा झाली तरी तसे निर्देश महापालिकेशिवाय इतर कुठल्याच केंद्रांना नव्हते. अतिरिक्त लस पुरवठा झाला नव्हता. शहरातील इतर लसीकरण केंद्रावरही २८ एप्रिलला हिच स्थिती होती. त्या दिवशी १ हजार मात्रा शहरात उपलब्ध होत्या. दुसरी मात्रा घेणाèयांना लस दिली जात होती. नवी खेप आली नव्हती. त्यामुळे लसीकरण रडतरखडत सुरू होते.