मिशन ऑक्सिजनसाठी सचिन तेंडुलकरने केली १ कोटीची मदत

मुंबई : ३० एप्रिल – देशातील करोनाच्या लढाईमध्ये आता भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्याच्या घडीला देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी आता सचिनने पुढाकार घेतला असून त्याने यासाठी मोठे दान केल्याचेही पाहायला मिळाले आहे.
देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहिल्यावर काही युवा उद्योजक आता पुढे सरसारवे आहेत. या मिशन ऑक्सिजनसाठी या युवा उद्योजकांना पैशांची चणचण भासत होती. पण सचिन यावेळी त्यांच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण सचिनने या मिशन ऑक्सिजनसाठी आता तब्बल एक कोटी रुपये दान केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता करोनाच्या लढ्यात सचिन उतरल्याचे पाहायला मिळाले आहे.

सचिनने काही दिवसांपूर्वी करोनावर मात केल्याचे पाहायला मिळाले होते. सचिन हा गेल्या काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी क्रिकेट सीरिजमध्ये खेळला होता. ही स्पर्धा भारताने जिंकली. पण ही स्पर्धा संपवून घरी आल्यावर सचिनला करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सचिनने करोनावर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटल गाठले होते आणि त्याने करोनावर मात केल्याचे पाहायला मिळाले. सचिनने काही दिवसांपूर्वी प्लाझ्मादेखील दान करण्याचे आवाहन केले होते.

Leave a Reply