नम्र निवेदन

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे. तितकाच उच्छाद या देशात सध्या माध्यमांनी मांडल्याचा आरोप सध्या केला जातो आहे. दररोज किती रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, कितींचा मृत्यू झाला, बेड्सचा, ऑक्सिजनचा, लसींचा आणि औषधांचा तुटवडा किती जास्त आहे, रुग्णवाहिकांचा किती तुटवडा आहे आणि रुग्णवाहिका चालक जनसामान्यांना कसे लुटत आहेत, स्मशानात अंत्यसंस्कारासाठी सुद्धा वेटिंग लिस्ट लागली आहे अशा आशयाच्या बातम्या जनसामान्यांच्या डोक्यावर दररोज नव्हे तर प्रत्येक क्षणाला अक्षरशः आदळत आहेत. त्यामुळे देशभरातील जनसामान्यांमध्ये एक नकारात्मकतेची भावना निर्माण झाल्याचे चित्र दिसते आहे.
या परिस्थितीत माध्यमांनी सकारात्मक बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत पुढाकार घ्यायला हवा अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त होते आहे. दररोज काही मृत्यू जरूर होतात त्याच वेळी मोठ्या संख्येत रुग्ण कोरोनावर मात करून घरीही परततात मात्र माध्यमे किती मृत्यू झाले याची मोठी हेडलाईन देतात त्यामुळेच नकारात्मकता वाढते अशी तक्रार केली जाते .
हा मुद्दा लक्षात घेऊन पंचनामा न्यूज पोर्टलने एक नवा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे आज कोरोनाचे अनेक रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहेत. अशा यशस्वी कोरोना रुग्णांच्या यशोगाथा पंचनामाने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे आपणास विनंती आहे की अशा रुग्णांच्या यशकथांबाबत पंचनामाला कळवावे, अशा यशकथा ९८९००१९३८३ या व्हाटसऍप क्रमांकावर किंवा panchanamanews@gamail.com या ईमेल वर युनिकोड मध्ये पाठवाव्या सोबत संबंधित रुग्णाचे छायाचित्रही पाठवावे. त्याला पंचनामामध्ये प्रसिद्धी दिली जाईल.
आपले सहकार्य अपेक्षित आहे.

अविनाश पाठक
मुख्य संपादक

Leave a Reply