टीव्ही अँकर रोहित सरदाणा यांचा कोरोनामुळे मृत्यू

नवी दिल्ली : ३० एप्रिल – वरीष्ठ टीव्ही पत्रकार आणि आज तक वाहिनीचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे आज सकाळी निधन झालं. त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोहित सरदाना हे झी न्यूजसोबत होते. २०१८मध्ये त्यांनी झी न्यूज सोडून आजतकमध्ये आपल्या प्रसारमाध्यमातील प्रवासाला सुरुवात केली. २०१८मध्ये त्यांना पत्रकारितेतील मानाच्या गणेश विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २४ एप्रिल रोजी रोहित सरदाना यांनी स्वत:च आपल्याला करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं.
त्यांच्या निधनानंतर माध्यम विश्वातील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply