वर्धा : २९ एप्रिल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्धेतील सेवाग्राम औद्योगिक वसाहतीतील जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा. लि. मधील प्रयोगशाळेत रेमडेसिविर निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ झाला, अशी माहिती जेनेटिक लाईफ सायन्सचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी दिली. आज या इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल पोहोचणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत प्रत्यक्ष उत्पादनाला प्रारंभ होईल. विदर्भातच ही लस उत्पादित होणार असल्याने येथील कोरोनाबाधितांना दिलासा मिळणार आहे.
वर्धेत रेमडेसिविर निर्मितीचा शुभारंभ
- Post author:Panchnama
- Post published:April 29, 2021
- Post category:विदर्भ
- Post comments:0 Comments