देशात कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येणार – नितीन गडकरींचे भाकीत

नागपूर : २९ एप्रिल – महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने होरपळून निघत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सज्ज राहा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.
नितीन गडकरी आज नागपुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आकडेवारी कमी होत असली तरी तिसरी- चौथी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने देखील आपल्याला आतापासून तयारी करणे आवश्यक आहे, असं गडकरींनी सांगितलं.
कोरोना विरुद्धची ही कठीण लढाई आपण लढत असताना एकमेकांना साह्य करून परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे. आपला आत्मविश्वास ढळू न देता अपुऱ्या साधन सामग्रीमध्ये काम करावं लागतं आहे. आपले डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहे. त्यांना मी चरणस्पर्श करतो आणि त्यांच्या उपकारात आपण नेहमी राहू, असं ते म्हणाले.

Leave a Reply