वर्धा जिल्ह्यात कोरोना आकड्यांची लपवाछपवी

वर्धा : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गेल्या एक वर्षांपासून राज्य सरकार कोरोनाची आकडेवारी लपवत असल्याचे आरोप करीत आहेत. राज्य सरकर तो आरोप खोटा ठरवत असले तरी वर्धा जिल्ह्यात सरकारी आकडेवारी वरून खोटारडेपणा उघड झाला आहे. रविवार २५ रोजी वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आजपर्यंतचे मृत्यू 676 सांगण्यात आले. नागपूर विभागाच्या अहवालात 567 तर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्धा जिल्ह्याचा मृत्यूचा आकडा फक्त 486 दाखवण्यात आला आहे. एकाच दिवशीच्या आकडेवारी एवढी तफावत असल्याने नेमका विश्वास कोणावर ठेवावा असा प्रश्न उपस्थित झाला. सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण सोडून आधी मदत पुरवावी, अशी ओरड आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी केली आहे.

वर्धा जिल्हा प्रशासन कोरोनाविषयी गँभीर नसल्याने आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा झाले आहेत. कंत्राटी डॉक्टर जिल्हा सामान्य रुग्णालयाची यंत्रणा सांभाळत असून लाखो रूपये वेतन घेणारे फक्त खाजगी रुग्णालय सांभाळण्यात मग्न आहेत. वर्धा जिल्ह्यात रविवार २५ रोजी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालात ३,७८६ चाचण्या झाल्याचे जाहीर करण्यात आले तर नागपूर विभागाने २,८८८ तसेच राज्य शासनाच्या लेखी फक्त ६८३ चाचण्याची नोंद आहे. रविवार पर्यन्त झालेल्या चाचण्या वर्धेने २ लाख ६१ हजार ७५६ तर नागपूर विभागाने २ लाख ५३ हजार ३९९ दाखवले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित वर्धेने ३१ हजार ३६०, नागपूर विभागाने ३८ हजार १३६ तर राज्य शासनाने ३७ हजार ८७० दाखवले आहेत. रविवारपर्यंत एकूण मुक्त वर्धेने २४ हजार ९४९, नागपूर विभागाने ३० हजार २९७ तर राज्य सरकारच्या लेखी ३१ हजार २३ मुक्त झाल्याची नोंद आहे.

तसेच रविवारपर्यन्त एकूण मृत्यू ६७६ नागपूर विभागाने ५६७ तर राज्य शासनाने फक्त ४८६ रुग्ण दगावले असे सांगितले असून सकारात्मक क्रियाशील रुग्ण वर्धेत ५ हजार ७३५ तर नागपूर विभागाने ६ हजार २८२ ची नोंद असल्याने नेमके कोणते आकडे खरे समजावे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भात आरोग्य अधिकारी अजय डवले यांच्यासोबत सम्पर्क केला असता ते म्हणाले की जिल्हा शल्य चिकित्सकांकडून येणारच अहवाल प्रसिद्ध केला जातो. सर्व अहवाल संगणकावर टाकल्या जातात. बऱ्याचदा ते उशिरा ऑपलोड होत असल्याने आकड्यात फरक होऊ शकतो, असे त्यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. 

मनस्ताप करणारे आकडे : नगराध्यक्ष सव्वालाखे

आपण मागील वर्षी कोरोनाचे संकट टाळावे यासाठी रस्त्यावर उतरलो होतो. यावर्षी सुद्धा नागरिकांना हात जोडून विनंती करतो आहे. नागरिकान स्वतःची काळजी नाही आणि शासन, प्रशासन जीवाशी खेळते आहे. आपण स्वतः गेल्या १० दिवसात आर्वी शहर आणि तालुक्यातील मृतकांचे आकडेवर लक्ष्य ठेऊन आहोत. सरकारी यंत्रणा आकडे लपवत असल्याचे आपल्या लक्षत आले. कोरोनातून जिवंत राहू तर राजकारण करू नाही तर सर्व व्यर्थ आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी दिली.

मृतकांच्या आकड्यात तफावत

*२० रोजी वर्धा समशानात ३० प्रेत जळाले. आरोग्य यंत्रणा जिल्ह्यात मृत्यू फक्त १२ सांगते.

*२१ रोजी वर्धेत २९ प्रेत जाळले शासकीय नोंद १२

*२२ रोजी ३९ जाळले शासकीय नोंद १६

*२३ रोजी ३८ जाळले शासकीय नोंद १७

*२४ रोजी ३८ जाळले शासकीय नोंद ३१

*२५ रोजी ३६ जाळले शासकीय नोंद ३१ तर

*२६ रोजी दुपारपर्यंत वर्धात २४ प्रेत जाळली होती.

Leave a Reply