बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली, ६२८७ बाधित, १०१ मृत्यू तर ६८६३ कोरोनामुक्त

नागपूर : २४ एप्रिल – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा कोरोनाचा प्रकोप सुरूच असला तरीही आज दुसऱ्या दिवशी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही बाधितांपेक्षा अधिक दिसून आली आहे. नागपुरात गेल्या १० दिवसात ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून गेल्या १० दिवसात १००० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पूर्व विदर्भात गेल्या २४ तासात १०७३० रुग्णांची नोंद झाली असून १७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहरात आज ६२८७ नवीन बाधित रुग्ण आढळून असून ६८६३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर तब्बल १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे’
गेल्या २४ तासात नागपूर शहरात ६२८७ बाधित रुग्ण आढळले असून १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या ६२८७ बाधितांमुळे एकूण बाधित संख्या ३८६३२७ वर पोहोचली आहे. आजच्या बाधितांपैकी २४६६ ग्रामीण तर शहरातील ३८१३ तर इतर जिल्ह्यातील ८ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या १०१ रुग्णांच्या मृत्यूमुळे एकूण मृत्युसंख्या ७१२६ वर पोहोचली आहे आज ग्रामीणमधील ३९ रुग्णांचा तर शहरातील ५४ रुग्णांचा तर इतर शहरातील ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात नागपुरात २२९०८ चाचण्या घेण्यात आल्या असून ५८८५ चाचण्या ग्रामीण भागात तर १७१२३ चाचण्या शहरात झाल्या आहेत. सध्या शहरात ७६७२१ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यात ३०५४९ ग्रामीण मध्ये तर ४६१७२ शहरातील रुग्ण आहेत, गेल्या २४ तासात ६८६३ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३०२४८० वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्तीचे प्रमाण ७८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Leave a Reply