रेमडेसिविर घोटाळा ‘बोफोर्स’ आणि ‘कोलगेट’ पेक्षाही मोठा

यवतमाळ : २६ एप्रिल – भारत सरकारच्या रसायन मंत्रालयात अंतर्गत औषध प्रशासन विभागाच्या ‘ड्रग्स प्राईस कंट्रोल अ़ॉर्डर’च्या प्रावधनात येणार्‍या राष्ट्रीय फार्मा प्राईस अ‍ॅथॉरिटीतील अधिकार्‍यांच्या संगनमताने कोरोना महामारी काळात काही औषध कंपन्या माफियाद्वारा संघटित रूपाने ‘रेमडेसिविर’ आणि अन्य अतिमहाग औषधांचा घोटाळा सुरू आहे. हा घोटाळा ‘बोफोर्स’ आणि ‘कोलगेट’ घोटाळ्यांपेक्षाही मोठा आहे. यात 57 हजार कोटी रुपयांची लूट झाली असून ती अजूनही खुलेआम सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सीबीआय आणि ईडी यांच्याकडून संयुक्तरित्या करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी केली आहे.
त्यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अन्न व औषध प्रशासन मंत्री सदानंद गौडा, राज्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्र सरकारचे सचिव, मु‘य केंद्रीय सतर्कता आयुक्त, नॅशनल फार्मा प्राईस अ‍ॅथॉरिटी तसेच ड्रग कंट्रोेलर जनरल ऑफ इंडिया यांना निवेदन पाठविले आहे.

रेमडेसिविर आणि अन्य औषधांची निर्मिती, साठा, वितरण, विक‘ी आणि अनाठायी उपयोग यात प्रचंड गैव्यवहार आणि काळाबाजार होत असल्याची तक‘ार बॅ. तिवारी यांच्याकडून करण्यात आली होती. आजपर्यंत भारतातील कोरोना संक‘मितांचा आकडा 1 कोटी 64 लाखांवर गेला आहे. रेमडेसिविर तसेच अन्य औषधांच्या होत असलेल्या काळाबाजारामध्ये आतापर्यत 57 हजार कोटींपेक्षा अधिक आर्थिक लाभ आणि बेकायदेशीर ग‘ाहकांची आर्थिक लूट करण्यात आली असून हा प्रकार अद्यापही सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply