कोविड रुग्णालयातून पळालेल्या कैद्याला कर्नाटकातून अटक

वर्धा : २६ एप्रिल – कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या कैद्याने रुग्णालयातूनच पळ काढला पोलिसांनी अथक प्रयत्नांनी त्याला कर्नाटक येथून अटक केली. ही घटना वर्धेतील हिंगणघाट येथे घडली. ईराणी टोळीतील चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी मोहम्मद शब्बार मोहम्मद शाबिर (वय १९), जाहिराबाद, तेलंगाना हा आरोपी वर्धा कारागृह येथे न्यायालय कोठडीत बंदिस्त असताना त्याला कोविड १९ ची लागण झाल्याने उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात सेवाग्राम येथे उपचारार्थ भरती करण्यात आले होते. याच संधीचा फायदा घेत आरोपीने रुग्णालयातील कोविड विभागातून २२ एप्रिल रोजी कर्मचार्‍यांच्या डोळ्यात धूळफेक करीत पसार झाला.
सदर आरोपी हा सेवाग्राम पोलीस हद्दीतून पसार होऊन त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला असता आरोपी हा दुरवर पळाला असे गुप्तचर माहिती मिळाली त्याचे शोध मोहीम व जेरबंद करण्याची जबाबदारी पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी हिंगणघाट पोलिसांना आदेश दिले.
त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संपत चव्हाण प्रगटीकरण पथकाचे प्रमुख शेखर डोंगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवदे, विशाल बंगाले, सचिन भालशंकर, यांनी आरोपीस बिंदर, कर्नाटक राज्यातून स्थानिक पोलीसांचे सहकार्य घेऊन अटक केली असून पुढील कारवाही करीता सेवाग्राम पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले

Leave a Reply