यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने ६ व्यक्तींचा मृत्यू

यवतमाळ : २५ एप्रिल – वणी येथील तीन व्यक्तींनी सॅनिटायझर पिल्याने शुक‘वार, 23 एप्रिलला रात्री त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर शनिवार, 24 एप्रिल रोजी आणखी तीन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्यामुळे मृत्यू होऊन एकूण 6 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची सगळ्यांना हादरवणारी घटना वणी येथे घडली. सध्या टाळेबंदी असल्याने सर्वत्र दारूची दुकाने बंद आहेत. परिणामी दारू पिण्याची सवय जडलेले तळीराम विविध युक्त्या लढवून अल्कोहोलचा शौक पूर्ण करण्याचा अफलातून प्रकार करीत असल्याचे वास्तव उघड झाले आहे.

शुक‘वार, 23 एप्रिलला येथील जैताईनगरातील गणेश उत्तम शेलार (वय 43), देशमुखवाडीतील सुनील महादेव ढेंगळे
(वय 36) व दत्ता कवडू लांजेवार (47 तेलीफैल) यांनी सॅनिटायझर पिल्याने त्यांना येथील ग‘ामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान शेलार व ढेंगळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच दत्ता कवडू लांजेवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी पहाटे आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात नूतन देवराव पाटणकर (ग‘ामीण रुग्णालयाजवळ, वणी), संतोष उर्फ बालू मेहर (वय 35, एकता नगर), विजय बावणे (रा. वणी) यांचा समावेश आहे.
या सर्व मृत्यू झालेल्या व्यक्तींनी दारू मिळत नसल्याने सॅनिटायझर पिऊन नशा करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. दत्ता लांजेवार, नूतन, बालू, विजय बावणे, सुनील ढेंगळे, गणेश शेलार हे मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. त्यांना दारू पिण्याची सवय होती.टाळेबंदीच्या काळात दारूविक‘ी बंद झाल्याने यांनी पिण्यासाठी 5 लिटरची सॅनिटायझरची कॅनच विकत घेतली होती. दरम्यान, त्यांनी या सॅनिटायझरचे सेवन केले. त्यानंतर एकाएकाची तब्येत बिघडू लागली. शुक‘वारी संध्याकाळी सुनील ढेंगळे, गणेश शेलार व दत्ता कवडू लांजेवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी पहाटे इतर तिघांचा मृत्यू झाला. मागील 24 तासांमध्ये 6 व्यक्तींचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली.

Leave a Reply