तक्रार दाखल करणाऱ्या युवतीचे अपहरण करून केला बलात्कार

बुलडाणा : २५ एप्रिल – अतिप्रसंग व अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींनी तक्रार दाखल केलेल्या युवतीला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव न्यायालयाजवळून अपहरण करुन गावात नेवून तिच्यासोबत कुटुंबीयाच्या मदतीने अतिप्रसंगी केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरुन 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवतीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, ती अमरावती येथील रहिवाशी असून अंभोडा येथील मोहन साहेबराव तायडे या युवकाच्या विरोधात अतिप्रसंग व अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल केले आहे. यावरुन शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सदरचा तपास सुरू असून हे प्रकरण खामगाव न्यायालयाअंतर्गत सुरू आहे.
दरम्यान,17 एप्रिल रोजी आरोपी मोहन तायडे यांचे भावजी प्रमानंद पवार यांनी फोनवरुन सायंकाळी 7.30 वाजता सांगितले की, ‘मोहन आणि तुझे लग्न लावून देतो, असं सांगत तू बुलडाणा येथे ये’. पण पीडितेनं त्यांना नकार देत सांगितले की, ‘मी बुलडाणा न्यायालयात येणार आहे.’ त्यानुसार पीडित खामगाव न्यायालयात आली होती.
त्यावेळी मोहन तायडे, प्रमानंद पवार, गजानन तायडे, साहेबराव तायडे व एका अनोळखी व्यक्तीने चारचाकी वाहनाने बुलडाणा तालुक्यातील अंभोडा येथील मोहन तायडे यांच्या राहत्या घरी नेले. यावेळी कुटुंबातील मीरा पवार, रामकोर तायडे, सुवर्णा तायडे, प्रतिभा तायडे, सुनिता तायडे यांनी मला बघितले आणि माझ्या अंगावर धावून आले. व त्यांनी मला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करीत एका खोलीत बांधून ठेवले. त्यानंतर प्रमानंद पवार, गजानन तायडे या दोघांनी माझ्यावर रात्री दीड वाजता अतिप्रसंग करीत अनैसर्गिक अतिप्रसंग केला, अशी तक्रार पीडितेनं दिली.

पीडितेच्या तक्रारीनंतर मोहन तायडे, प्रमानंद पवार, गजानन तायडे, साहेबराव तायडे, मिरा पवार, रामकोर तायडे, सुवर्णा तायडे, प्रतिभा व सुनिता यांच्या विरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कलम 377,376 ड, 366, 323, 34 भादविनुसार गुन्हे दखल करण्यात आले आहे. सध्या आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply