कोरोनाची साखळी तुटता तुटेना, २४ तासात ७७७१ बाधित तर ८७ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २५ एप्रिल – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा कोरोनाचा प्रकोप अविरत सुरूच असून दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. आज पूर्व विदर्भात १२९५२ नवीन बाधित रुग्ण आढळले असून १७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नागपूर शहरात आज ७७७१ नवीन बाधित रुग्ण आढळून असून ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे’
गेल्या २४ तासात नागपूर शहरात विक्रमी ७७७१ बाधित रुग्ण आढळले असून ८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या ७७७१ बाधितांमुळे एकूण बाधित संख्या ३७४१८८ वर पोहोचला आहे आजच्या बाधितांपैकी ३०४० ग्रामीण तर शहरातील ४७२० तर इतर जिल्ह्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या ८७ रुग्णांच्या मृत्यूमुळे एकूण मृत्युसंख्या ६९३६ वर पोहोचली आहे आज ग्रामीणमधील ३० रुग्णांचा तर शहरातील ४६ रुग्णांचा तर इतर शहरातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात नागपुरात २४७०१ चाचण्या घेण्यात आल्या असून ८३२२ चाचण्या ग्रामीण भागात तर १६३७९ चाचण्या शहरात झाल्या आहेत. सध्या शहरात ७७५५६ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यात ३०४८९ ग्रामीण मध्ये तर ४७०६७ शहरातील रुग्ण आहेत, गेल्या २४ तासात ५१३० रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २८९६९६ वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्तीचे प्रमाण ७७.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Leave a Reply