वऱ्हाडी ठेचा

भीक मागताना यांना
वाटत नाही लाज
भीक दिल्यावर मात्र
दाखवतात माज !
एक कंपौंडर छाप नेता म्हणतो
” ऑक्सिजन दिला म्हणजे
उपकार नाही केले ‘!
मग आधी कशाला त्यासाठी
गळेफाड रडले !
हे पाहून मला त्या
माकडाचं काळीज मागणाऱ्या
कृतघ्न मगरीची आठवण आली !
लोकांच्या मनात असलेली
थोडीशी सहानुभूतीही
आता आघाडीने गमावली !

Leave a Reply